गुरगुडे बंधूं sakal
पुणे

बाभूळगाव : गुरगुडे बंधूंचे डाळिंब सलग दुसऱ्या वर्षी परदेशी रवाना

भगव्या जातीच्या डाळिंब्यातून खर्च वजा जाऊन ४९ लाख रुपयांचा नफा

डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : इंदापूर तालुक्‍याच्या पूर्व भागात उजनी धरण जवळ असलेल्या बाभूळगाव ( ता. इंदापूर ) येथील दिपक आबासाहेब गुरगुडे व प्रदिप आबासाहेब गुरगुडे या सुशिक्षित शेतकऱ्यांचे भगव्या जातीचे डाळिंब सलग दुसऱ्या वर्षी परदेशात बांगला देश येथे रवाना झाली. या फळपिकातून त्यांना खर्च वजा जाऊन ४९ लाख रुपयांचा नफा मिळाला आहे. कोरोना महामारी असताना त्यांच्या डाळिंबास चांगला दर मिळाल्याने त्यांनी आणखी सहा एकर भगवा डाळिंब केले असून त्यामध्ये ७५०० झेंडू लावून आंतरपीक घेतले आहे तर दोन एकर मध्ये जम्बो केशर जातीचा आंबा लावला आहे.

गुरगुडे बंधूं

दिपक व प्रदिप यांचे आई, वडील हे शेतकरी आहेत. त्यांना दोन्ही मुलांनी शिकून नोकरी करून साहेब व्हावे असे वाटायचे. त्यामुळे त्यांनी दीपक यास एमएबीपीएड तर प्रदिप यास बीए पर्यंत शिकवले.मात्र दोघांनी नोकरीची अपेक्षा न ठेवता काळ्या आईची सेवा करण्यास सुरुवात करून उत्तम शेती व्यवसाय चांगला असल्याचे सिद्ध करून दाखवले.

सुरवातीस त्यांनी साडे चार एकर क्षेत्रावर ९ बाय १४ फूट अंतरावर १८०० डाळिंबाचीरोपे लावली असून त्यांचे हे चौथे पीकआहे.त्यांचे ५५ टन डाळिंब झाले असून पैकी ४४ टन ए वन मालास १३१ रुपये प्रति किलो दर मिळून ती परदेशी रवाना झाली. त्यातून त्यांना ५७ लाख ६४ हजार रुपये तरत्यांच्या बी ग्रेडच्या ६ टन डाळिंबास ५४ रुपये प्रति किलो दर मिळून त्यांना ३ लाख २४ हजार रुपये मिळाले. त्यांचे ५ टन डाळिंब शेतात शिल्लक असून त्यांना एकूण ६० लाख ९७ हजार रुपये उत्पन्न झाले आहे. त्यांचाऔषधे ,बहर, जल व खत व्यवस्थापनाचा खर्च ७ लाख तर मजूर खर्च ४ लाख असा एकूण ११ लाख ८५ हजार रुपये आलाअसूनत्यांना खर्च वजा जाता ४९ लाख १३हजाररुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. त्यांचा गाय,म्हैस व वासरे असे २५ जनावरांचा मुक्त गोठा असून मुरघास व मिल्किंग मशिनचा ते वापर करतात. त्यांचे प्रतिदिन १८० ते १९० लिटर दुध उत्पादन होत असून प्रति महिना सुमारे १ लाख ४० हजार रुपयांची उलाढाल आहे. खर्च वजा जाता त्यांना ४० ते ५० हजार रुपये त्यातून नफा होतो.

कर्नाला येथे शास्त्रोक्त दूध निर्मिती,कोईमतूर येथे ऊस पैदास केंद्रात घेतलेले प्रशिक्षण, पंतप्रधान कौशल्य व उद्योजकताविकासयोजने अंतर्गत इंदापूर व बाभूळगाव येथे घेतलेले प्रशिक्षण, त्यास तालुका कृषि अधिकारी भाऊसाहेब रुपनवर, कृषी मंडळ अधिकारी आबासाहेब रूपनवर, नाना साळुंखे,ओंकार काळे, हनुमंत बोडके, संजय लोणकर यांचे मिळालेले शास्त्रोक्त मार्गदर्शन, जिद्द, आत्म विश्वास तसेच प्रामाणिक कष्ट हेचखरेभांडवल या जोरावर शेती व्यवसायात यशस्वीझाल्याचे दीपक गुरगुडे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT