babukaka shirgaonkar memorial Chess Tournament title to West Bengal Grandmaster Mitrabha Sakal
पुणे

बाबूकाका शिरगावकर स्मृती बुद्धिबळ स्पर्धा : पश्‍चिम बंगालच्या ग्रँडमास्टर मित्रभाला जेतेपद

सकाळ वृत्तसेवा

Pune News : सांगलीच्या नूतन बुद्धिबळ मंडळाने जेकेज एक्सलन्स बुद्धिबळ अकादमीच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ५५व्या बाबूकाका शिरगावकर स्मृती खुल्या फिडे रॅपिड मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत पश्चिम बंगालच्या मित्रभा गुहाने तमिळनाडूच्या वेंकटेश एमआरला बरोबरीत रोखताना अव्वल क्रमांक पटकावीत जेतेपद संपादिले.

अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना (एआयसीएफ) आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या (एमसीए) मान्यतेने सिंहगड रोड येथील गुलमोहर हॉल, अभिरुची मॉल येथे संपलेल्या या स्पर्धेच्या नवव्या व अंतिम फेरीत पहिल्या पटावर पश्चिम बंगालच्या मित्रभा गुहाने तमिळनाडूच्या वेंकटेश एमआरला बरोबरीत रोखले.

२३ वर्षीय मित्रभा गुहाने इंग्लिश ओपनिंग पद्धतीने सुरवात करत एमआर वेंकटेशला २५ चालींमध्ये बरोबरीत रोखले. मित्रभा गुहाने ५३.५ बुकोल्स कट गुण सरासरीच्या जोरावर आठ गुणांसह अव्वल क्रमांक मिळविला.

तमिळनाडूच्या वेंकटेश एमआरने ५१.५ बुकोल्स कट गुण सरासरीच्या जोरावर आठ गुणासह दुसरा तर कोल्हापूरच्या सम्मेद शेटेने आकाश दळवीचा पराभव करून आठ गुणांसह तिसरे क्रमांक मिळविला.

या स्पर्धेतील विजेत्या मित्रभा गुहाला करंडक व ६० हजार रुपये, उपविजेत्या वेंकटेश एमआरला करंडक व ४० हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी नूतन बुद्धिबळ मंडळाचे उपाध्यक्ष चिदंबर कोटीभास्कर, संजय केडगे, चिंतामणी लिमये, शिवछत्रपती पुरस्कार विजेते जयंत गोखले,

यशदाचे उपसंचालक शेखर गायकवाड, वंदना गायकवाड, उद्योजक कुमार लागू, रमा लागू, सीए किशोर गुजर दिलीप कोटीभास्कर, राजेंद्र कोंडे, सीमा कठमाळे, माधुरी कात्रे, चीफ आरबीटर राजेंद्र शिदोरे, उल्हास माळी, जुईली कुलकर्णी हे उपस्थित होते.

नवव्या व अंतिम फेरीचे काही निकाल :

मित्रभा गुहा (पश्चिम बंगाल, ८ गुण) बरोबरी विरुद्ध वेंकटेश एमआर (तमिळनाडू, ८ गुण); सम्मेद शेटे (महाराष्ट्र , ८ गुण) वि.वि. आकाश दळवी (महाराष्ट्र, ७ गुण); ऋत्विज परब (गोवा, ८ गुण) वि.वि. सुयोग वाघ (महाराष्ट्र, ७ गुण);

आयुष शर्मा (मध्य प्रदेश, ७.५ गुण) वि.वि. अखिलेश नागरे (महाराष्ट्र , ६.५ गुण); ऋतुजा बक्षी(महाराष्ट्र, ७ गुण) बरोबरी विरुद्ध समीर कठमाळे (महाराष्ट्र, ७ गुण); विक्रमादित्य कुलकर्णी (महाराष्ट्र , ७.५ गुण) वि.वि. अरविंद अय्यर (महाराष्ट्र, ६.५ गुण); अभिषेक केळकर (महाराष्ट्र, ७ गुण) बरोबरी विरुद्ध विकास शर्मा (महाराष्ट्र, ७ गुण); साई अग्नी जीवितेश (तेलंगणा, ७.५ गुण) वि.वि. दिशा पाटील (महाराष्ट्र, ६.५ गुण); पारस भोईर

(महाराष्ट्र, ७.५ गुण) वि.वि. ओजस कुलकर्णी (कर्नाटक, ६.५ गुण); मानस गायकवाड (महाराष्ट्र, ६.५ गुण) पराभूत विरुद्ध प्रज्वल शेट (कर्नाटक, ७ गुण); पी. सर्वाना कृष्णन (तमिळनाडू, ६.५ गुण) बरोबरी विरुद्ध यश वातारकर (महाराष्ट्र, ६.५ गुण);

सौरभ म्हामणे (महाराष्ट्र, ६ गुण) पराभूत विरुद्ध गौरव झगडे (महाराष्ट्र ,७ गुण); ऋषिकेश कबनूरकर (महाराष्ट्र, ६ गुण) पराभूत विरुद्ध गौरांग बागवे (महाराष्ट्र, ७ गुण); दिव्या पाटील (महाराष्ट्र, ७ गुण) वि.वि.अरुण कटारिया (राजस्थान, ६ गुण); अंजनेय फाटक (महाराष्ट्र, ६ गुण) पराभूत विरुद्ध नमीत चव्हाण (महाराष्ट्र, ७ गुण).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT