वाघोली : वारंवार तुटत असलेली चेंबरची जाळी. अपघात होईल असे महामार्गावर पडलेले खड्डे, पदपथांची झालेली दुरवस्था हे चित्र आहे. पुणे नगर महामार्गाचे वाघोलीतील केसनंद फाटा परिसरात. कशी वाहतूक सुरळीत चालेल. असा सवाल नागरिक करीत आहेत.
नगर कडे जाताना केसनंद फाट्यावर भर चौकात चेंबरची जाळी पूर्णपणे तुटलेली आहे. या तुटलेल्या जाळीत वाहनांची चाके रुतण्याचा प्रकारही घडतो. येथील चेंबरच्या जाळ्या वारंवार तुटतात.
यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. सध्या अपघात होवू नये म्हणून तेथे बरिकेट्स ठेवण्यात आले आहे. तर पुण्याकडे जाणाऱ्या बाजूला महामार्गावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात वाहने आदळतात. तर दुचाकी धारकांचे अपघात होतात. येथील पदपथावरील ब्लॉक्स तर गायबच झाले आहेत. काही दिवसापूर्वी नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर सांडपाण्याचा प्रश्न होता. सध्या ते पाणी नसले तरी खड्यांचा प्रश्न आहे.
यामुळे केसनंद फाटा परिसरात वाहतुकीला काही ना काही अडथळा नेहमीच निर्माण होतो. या चेंबर वरील जाळ्या नेहमीच तुटतात. यामुळे अपघात तर होतातच. शिवाय वाहतुकीला अडथळा होतो. जितेंद्र शेटीया, व्यावसायिक महामार्गावरील खड्ड्याने अपघात होत आहेत. नागरिकांना चालण्यासाठी पदपथ ही चांगला नाही. अशी दुरवस्था असायला नको
-के एन सातव, नागरिक
-नीलेश कांकरीया
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.