Amitabh Gupta sakal
पुणे

खराब रस्ते व खड्डे असलेले रस्ते तत्काळ बुझविण्यात यावेत - अमिताभ गुप्ता

मागील एक ते दोन महिन्यापासून पुणे शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

मागील एक ते दोन महिन्यापासून पुणे शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

पुणे - शहरात वाहतूक कोंडी झाल्यानंतर पहिल्यांदा वाहतूक पोलिसांना लक्ष्य केले जाते. मात्र वाहतूक कोंडी केवळ पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच नव्हे, तर खड्डे, खराब रस्त्यामुळे हि होते, याचा विसर पडतो. मात्र याच मुख्य कारणाकडे वेधून शहरातील 75 ठिकाणचे खराब रस्ते व खड्डे तातडीने दुरुस्त करण्यात यावेत, याबाबत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे रस्ते दुरुस्त झाल्यास वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आणखी काही प्रमाणात मदत होण्याची शक्यता आहे.

मागील एक ते दोन महिन्यापासून शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. परिणामी वाहतूक पोलिसांचा रस्त्यावरील अभाव आणि वाहतूक नियमन करण्याऐवजी दंडात्मक कारवाई करण्याकडे दिला जाणारा भर यामुळे वाहतूक पोलिसांना नागरिकांसह विविध विभागांकडून हि टीकेचे धनी केले जाते. त्यातच काही दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाने पोलिसांना काही ठिकाणी वाहतूकीच्या नियमांची अंमलबजावणी करण्यास सांगितले होते. एकीकडे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणत खड्डे असताना, अनेक रस्ते खराब झालेले असतानाही तेथे सुधारणा करण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी केवळ वाहतूक पोलिसांनाच टीकेचे धनी व्हावे, लागत होते.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठविले आहे. त्यामध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागातील खराब रस्ते व मोठ्या प्रमाणत खड्डे असलेल्या 75 ठिकाणांची नावे देण्यात आली आहेत. त्यानुसार, संबंधित रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात यावेत. रस्ते दुरुस्त झाल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यासह गंभीर स्वरूपाचे अपघात हि कमी होतील असे संबधित पत्रात नमूद केले आहे.कोरेगाव पार्क, लोणीकंद, लष्कर, वानवडी, कोंढवा,हडपसर, मुंढवा, लोणी काळभोर आदी विभागातील रस्त्यांवर खड्डे आहेत, तर अनेक रस्ते खराब आहेत.

'काही ठिकाणचे बहुतांश रस्ते खराब आहेत, तर अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणत खड्डे आहेत. खराब रस्ते व खड्डे दुरुस्त करण्यात यावेत, याबाबत पोलिस आयुक्तांनी महापालिका प्रशासनाला पत्र पाठविले आहे. त्यामध्ये 75 ठिकाणचा समावेश आहे." अशोक तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा नियोजन.

असे आहेत खराब रस्ते व खड्डे पडलेले रस्ते

• कोथरूड विभाग

- वेदभवन चौक ते कोथरूड डेपो चौक

- नळस्टॉप चौक ते पौड फाटा चौक

- आठवले चौक ते नळ स्टॉप चौक

• डेक्कन विभाग

- गरवारे पूल ते खंडूजीबाबा चौक

- स्वातंत्र्य चौक ते रसशाळा

- लकडीपुल

• चतु:शृंगी विभाग

- बालेवाडी चौक ते पॅन कार्ड

- राजवाडा हॉटेल ते बाणेर फाटा

- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौक ते एस.बी.जंक्शन

• शिवाजीनगर

- सुभाषचंद्र बोस चौक ( संचेती रुग्णालय) ते शिवाजीनगर

- वीर चाफेकर चौक ते शिवाजीनगर

• खडकी

- किर्लोस्कर कंपनी ते गुरुद्वारा

- पाचवड चौक ते आरगडे कॉर्नर

- सीएफडी डेपो ते फॅक्टरी हॉस्पिटल

• येरवडा विभाग

- गुंजन चौक ते गोल्फ क्लब चौक

- पूर्णकुटी चौक ते गुंजन चौक

- सादलबाबा चौक

• बंडगार्डन विभाग

- आरटीओ चौक ते शाहीर अमर शेख चौक

-शाहीर अमर शेख चौक ते मालधक्का स्टेशन

- बोलाई चौक ते साधू वासवानी चौक

- पुणे स्टेशन ते अलंकार चौक

- आयबी चौक ते सर्किट हाऊस चौक

• भारती विद्यापीठ विभाग :

- कात्रज चौक ते जुना बोगदा

- कात्रज चौक ते नवले पुल

- कात्रज चौक ते गोकुळ नगर बस्थांबा (कात्रज कोंढवा रस्ता)

- पद्मावती चौक

• सहकार नगर विभाग

- महेश सोसायटी चौक ते पासलकर चौक

- स्वामी विवेकानंद रस्ता

• स्वारगेट विभाग

- जेधे चौक ते गोळीबार मैदान चौक

- सेवन लव्हज चौक ते आईमाता मंदिर

• नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता )

- भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौक

• वारजे विभाग

- वारजे ते एन डी ए रस्ता

- ढोणे रस्ता

- उत्तमनगर रस्ता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT