Balasaheb Bende and Pradip Valse Patil sakal
पुणे

भीमाशंकरच्या अध्यक्षपदी बाळासाहेब बेंडे यांची तर उपाध्यक्षपदी प्रदीप वळसे पाटील यांची बिनविरोध निवड

सुदाम बिडकर

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बाळासाहेब बेंडे यांची दुसर्यांदा तर उपाध्यक्षपदी प्रदीप प्रतापराव वळसे पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

पारगाव - दत्तात्रयनगर (पारगाव) ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बाळासाहेब बेंडे यांची दुसर्यांदा तर उपाध्यक्षपदी प्रदीप प्रतापराव वळसे पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने सर्वच्या सर्व २१ जागा जिंकत भीमाशंकर कारखान्यावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भीमाशंकर कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व निवडणूक निर्णय अधिकारी सारंग कोडीलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत अध्यक्षपदी बाळासाहेब बेंडे व उपाध्यक्षपदी प्रदीप वळसे पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. बेंडे यांचा दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते तर उपाध्यक्ष श्री. वळसे पाटील यांचा शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे , जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कारखान्याचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गावडे, पिंपळगावचे सरपंच दीपक पोखरकर, गणपत इंदोरे, निरगुडसरचे माजी उपसरपंच रामदास वळसे पाटील, दिलीप लोखंडे तसेच नवनिर्वाचित संचालक संचालक देवदत्त निकम, बाळासाहेब घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, दादाभाऊ पोखरकर, शांताराम हिंगे, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, अंकित जाधव, अरुण चासकर, अक्षय काळे, बाजीराव बारवे, सीताराम लोहोट, ज्ञानेश्वर आस्वारे, नितीन वाव्हळ, रामहरी पोंदे, पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले ,कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे उपस्थित. श्री. बेंडे कारखान्याच्या सुरुवातपासून संचालक असून नऊ वर्ष उपाध्यक्ष म्हणून तसेच अडीच वर्ष अध्यक्ष म्हणून काम पहिले आहे तर प्रदीप वळसे १० वर्षापासून संचालक म्हणून कार्यरत आहे.

या वेळी बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड हि सर्व संचालकांनी एकदिलाने केली आहे. येणारा गाळप हंगाम आव्हानात्मक असणार आहे कारण परिसरात नवीन कारखाने सुरु झाले आहे जिल्ह्यातील अनेक कारखान्याने गाळप क्षमता वाढवली आहे त्यामुळे चांगले नियोजन करून जास्तीत जास्त गाळप करणे याला प्राधान्य द्यावे लागेल, इथेनॉल निर्मितीसाठी डीस्टलरी प्रकल्प तसेच नवीन १६ मेगावॉट क्षमतेचा सहवीजनिर्मिती प्रकल्प वेळेत पूर्ण करावा लागणार आहे शेतकर्यांच्या ऊसाला दरवर्षी चांगल्यात चांगला बाजारभाव देऊन सर्वांच्या सहकार्याने कारखान्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊ अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

बेंडे पाटील मनोगतातून म्हणाले कारखान्याने देश व राज्य पातळीवरील एकूण २४ पुरस्कार प्राप्त केले आहे. कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीतही कारखान्याचे विस्तारीकरणाचे काम पूर्ण केले त्यामुळे मागील हंगामात उच्चांकी गाळप झाले चालु गाळप हंगामात प्रतिदिन सात हजार मेट्रिक टनापर्यंत गाळप करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

प्रदीप वळसे पाटील मनोगतातून म्हणाले भीमाशंकर साखर कारखान्याला एक गौरवशाली परंपरा आहे सर्वांना बरोबर घेऊन कारखान्याचा नावलौकिक वाढविण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले. आभार बाबासाहेब खालकर यांनी मानले.,

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: 'मातोश्री'वरुन दिलेले एबी फॉर्म उमेदवारांनी नाकारले? आदित्य ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

Diwali 2024: दिवाळीत भेसळयुक्त खव्यापासून बनवलेली मिठाई खाल्ल्यास होऊ शकतो कॅन्सर, FSSAI ने सांगितले नकली खवा कसा ओळखाल

Sunny Deol : पर्वतांमध्ये रमला सनी देओल, पण चर्चा कॅप्शनचीच; नेटकरी कमेंट करत म्हणाले-

IND vs NZ, 1st Test: भारताला रचिन-साऊदी पडले भारी! न्यूझीलंडकडे तब्बल ३५६ धावांची विक्रमी आघाडी

SCROLL FOR NEXT