baner balewadi area republic day celebrated with cultural programs Sakal
पुणे

Republic Day : बाणेर ,बालेवाडी परिसरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

बाणेर, बालेवाडी परिसरातील विविध सोसायटी, शाळा ,महाविद्यालय, सामाजिक संस्था, संघटना येथे प्रभात फेरी, झेंडावंदन ,भारत मातेच्या जयघोषत ,विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

शीतल बर्गे

बालेवाडी : बाणेर, बालेवाडी परिसरातील विविध सोसायटी, शाळा ,महाविद्यालय, सामाजिक संस्था, संघटना येथे प्रभात फेरी, झेंडावंदन ,भारत मातेच्या जयघोषत ,विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

बालेवाडी येथील मनपा क्रमांक १५२(बी) व १२१( बी) येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त बालेवाडीतील एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विशाल बालवडकर यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला

त्यानंतर स्काऊट गाईड पथकाचे संचलन, कवायत प्रकार सादर करण्यात आले. पुणे महापालिका आंतरशालेय अंतिम कबड्डी स्पर्धेतील विजयी खेळाडूंना चषक व सन्मानपत्र देण्यात आले. सकाळ स्कूल ऑलंपिक, ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धेमध्ये विजयी विद्यार्थ्यांना ही प्रशस्तीपत्रक देण्यात आले .

विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे, माजी नगरसेवक अमोल बालवडकर ,माजी नगरसेविका ज्योती कळमकर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर ,

राहुल बालवडकर ,पुनम विधाते, प्रकाश बालवडकर तसेच गावातील इतर मान्यवर उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता वाघमारे यांनी ,आभार सुकेशिनी मोरे ,तर सूत्रसंचालन गणेश कदम यांनी केले.

२). श्री खंडेराय प्रतिष्ठान येथील प्रजासत्ताक दिन सोहळा

बालेवाडी येथील श्री खंडेराय प्रतिष्ठान शिक्षण संस्थेच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे विशाल बालवडकर ( डी वाय एस पी) व रितेश भंडारी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

सी. एम. इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनींनी ध्वज गीत साजर केले. मार्तंड भैरव अध्यापक महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत सादर केले.सी. एम इंटरनॅशनल चे विद्यार्थी व स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी शानदार संचलन सादर केले.

माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. प्रमुख पाहुणे श्री विशाल बालवडकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा संदेश देताना ,"जिद्दीने ध्येय साध्य करण्याचा मूलमंत्र दिला. "

रितेश भंडारी यांनीही विद्यार्थ्यांना ,"शाररिक तंदुरुस्ती चे महत्व सांगितले." याप्रसंगी खंडेराय प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. सागर बालवाडकर, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, गणपतराव बालवडकर ,

श्री.म्हातोबा तुकाराम बालवडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या दसगुडे पी.जी., पर्यवेक्षक डफळ डी.आर. ज्युनिअर कॉलेजच्या विभाग प्रमुख प्रा. जमाले मॅडम ,सी.एम. इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य इक्बाल कौर राणा,

डी. एम. आर.चे डायरेक्टर डॉ.साजिद अल्वी, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक मस्के जी. एस.,प्रा. रूपाली बालवडकर, मयुरी बालवडकर, तसेच सर्व विभागांचे प्राध्यापक, अध्यापक, पालक वर्ग आवर्जून उपस्थित होता. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

३)बाणेर येथील पुणे महापालिका शाळा क्रमांक १५१ बी, कै. सोपानराव बाबुराव कटके प्राथमिक विद्यालयात ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा:- येथे नवनियुक्त उपजिल्हाधिकारी विशाल दिलीप बालवडकर यांनी ध्वजवंदन केले.

शाळेतील स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी संचलन करत तिरंगी ध्वजाला मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी समूह गीत सादर केले. यावेळी नवनियुक्त उपजिल्हाधिकारी विशाल बालवडकर यांचा सत्कार माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता बंड सूत्रसंचालन संतोष वालकोळी यांनी केले. येथे विद्यार्थ्यांना खाऊचेही वाटप करण्यात आले.

या वेळी माजी नगरसेवक अमोल बालवडकर, ज्योती कळमकर यांनी ध्वज पूजन केले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते राहुल बालवडकर, पूनम विधाते, विशाल विधाते, अर्जुन शिंदे, नितीन कळमकर, माणिक गांधिले, विजय मुरकुटे,

शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता बंड आर्दीसह शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, सदगुरू आणि ज्ञानेश्वर महिला बचत गटाच्या सदस्यांसह ग्रामस्थ, विद्यार्थी आणि शिक्षकवृंद उपस्थित होते.

तर बाणेर, बालेवाडी येथील विविध सोसायटीतून, सर्व सदस्यांनी एकत्र येऊन विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत, झेंडा वंदन करून प्राजसत्ताक दीन साजरा करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : प्रकाश आंबेडकर, AIMIM अन् अपक्ष, महाराष्ट्रात कोणाचा खेळ बिघडणार? गणित समजून घ्या...

स्टार प्रवाहच्या नायिकेची झी मराठीवर एंट्री; 'लक्ष्मी निवास' मालिकेत देणार पाठक बाईंना टक्कर; पाहा नवा प्रोमो

Mumbai Vidhansabha Result: दक्षिण मुंबईतील कौल नक्की कोणाला? मनसेमुळे लढतीत रंगत!

Jaggery Poha Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा गोड गुळाचे पोहे, लगेच लिहा रेसिपी

AUS vs IND 1st Test: बुमराहने टॉस जिंकल्याने टीम इंडियाचा पर्थ कसोटीत विजयही पक्का? वाचा काय सांगतायेत रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT