बारामती येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दाखल खटल्यात सागर उर्फ संदीप महादेव निकम याला सात वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
बारामती - येथील अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) अत्याचार केल्या प्रकरणी दाखल खटल्यात सागर उर्फ संदीप महादेव निकम (रा. झारगडवाडी, ता. बारामती) याला येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश आर. व्ही. लोखंडे यांनी सात वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा (Punishment) सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिने कारावास भोगावा लागणार आहे. (baramati accused punishment in minor girl Tyranny case crime)
या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात पिडीतेच्या आईने फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार निकम याच्या विरोधात लैंगिक अत्याचारासह, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम, विनयभंग, अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला होता. 4 जुलै 2019 रोजी ही घटना घडली होती.
फिर्यादी ही मुला-मुलींसह गावात पालखीचे गोल रिंगण पाहण्यासाठी गेली होती. त्यावेळी पिडीतेला लघुशंकेला जायचे असल्याने ती तेथून उठून बाजूला गेली. थोड्याच वेळात मुलीच्या ओरडण्याचा आवाज आल्याने फिर्यादी तिकडे धावत गेली. यावेळी गावातील सागर उर्फ संदीप महादेव निकम हा तिला उचलून तिच्यावर अत्याार करताना दिसला. पिडीतेला प्रतिकार केला असता त्याने गळा दाबून शिविगाळ, दमदाटी केली होती.
तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी तपास करत आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड. कमलाकर नवले यांनी चार साक्षीदार तपासले. त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने निकम याला शिक्षा सुनावली.
या खटल्यात बारामती तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश ढवाण यांच्यासह पोलिस हवालदार अभिमन्यू कवडे यांनी सरकार पक्षाला मदत केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.