बारामती - येथील विमानतळावरील रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग अँकेडमी वैमानिक प्रशिक्षण संस्थेचे देशभरातील कामकाज तत्काळ निलंबित करण्याचे आदेश डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशनचे डायरेक्टर फॉर फ्लाईंग ट्रेनिंग कॅप्टन अनिल गिल यांनी दिले आहेत.
टेक्नम पी 2008जे या विमानाचा अपघात झाल्याची नोंद घेत डीजीसीएनी ही कारवाई केली आहे. या संदर्भात कंपनीला ईमेल पाठवून तातडीने कामकाज निलंबित करत असल्याचे आदेशच देण्यात आले आहेत.
या बाबत पाठविलेल्या ईमेलमध्ये अनिल गिल यांनी नमूद केले आहे की, रेडबर्ड या अँकेडमीचा गेल्या सहा महिन्यातील हा पाचवा अपघात आहे. तांत्रिक दोषासह इतर देखभाल दुरुस्ती या मुळे हे अपघात घडले आहेत. डीजीसीए आपल्या संस्थेच्या देखभाल दुरुस्तीबाबत संपूर्ण तपासणी करणार आहे. या शिवाय (डेझिग्नेटेड एक्झामिनर) प्रशिक्षकांची क्षमता व त्यांचे अधिकार तपासले जाणार आहे.
या सर्व बाबी पूर्ण होईपर्यंत सर्व ठिकाणचे कामकाज तातडीने निलंबित करण्यात येत असल्याचे डीजीसीएकडून या ईमेलमध्ये नमूद करण्यात आले आहे. बारामतीत गेल्या चार दिवसात रेड बर्ड या विमान प्रशिक्षण कंपनीच्या दोन विमानांचे अपघात झाल्यानंतर डीजीसीएकडून याची गांभीर्याने दखल घेतली गेली. या अपघातात तीन जण जखमी झाले होते, सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नव्हती.
या अपघातानंतर विमानतळ परिसरातील उद्योजकांसह ग्रामस्थांमध्येही काहीसे भीतीचे वातावरण होते, त्या मुळे आता संपूर्ण तपासणी करुनच डीजीसीए कडून पुढील कामकाजाबाबत रेडबर्डला निर्देश दिले जातील.
दोन अपघात झाल्यानंतरही रेडबर्डच्या कोणत्याही प्रतिनिधीने या अपघाताबाबत कोणतीही अधिकृत माहिती तर दिलीच नाही किंवा प्रसिध्दीपत्रकही जारी केलेले नव्हते. अपघात झाल्यानंतर विमान झाकून ठेवले गेले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.