ajit pawar sakal
पुणे

Ajit Pawar: राज्यपाल नियुक्त आमदार पदाची देवकाते समर्थकांची मागणी; अजित पवारांच्या पुढेच बारामतीत शक्ती प्रदर्शन

Latest Baramati News: महायुती सरकारच्या तिन्ही पक्षाचे एकमत होणे खूप महत्वाचे आहे

कल्याण पाचांगणे : सकाळ वृत्तसेवा

Latest Maharashtra News: राज्यपाल नियुक्त आमदारपदी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव उर्फ नाना पाटील देवकाते यांची नियुक्ती करा, या मागणीसाठी आज देवकाते समर्थकांनी बारामतीत निर्णायक भूमिका घेतली. बारामती दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढेच देवकाते समर्थकांसह धनगर समाज बांधवांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले.

नाना पाटी.. तुम आगे बडो हम तुमारे साथ है,फिक्स आमदार नाना पाटील आदी लक्षवेधी घोषणांनी राष्ट्रवादी भवन अक्षरश: दुमदुमून गेले होते. `राज्यपाल नियुक्त आमदारांचा निर्णय पक्ष पातळीवर आणि मुख्यमंत्रीस्तरावर निश्चित होणार आहे. आपल्या निवेदनचा आदर करतो व पुढील कार्य़वाहीसाठी स्वीकारतो, ` असा शब्दात अजित पवार यांनीही देवकाते समर्थकांना समजावण्याचा प्रयत्न केला.

महाराष्ट्रात विधान सभा निवडणूक अचारसंहिता लागण्याच्या आगोदर रखडलेली राज्यपाल नियुक्त १२ आमदार पदाची यादी निश्चित होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अर्थात ही राजकीय प्रक्रिया पुर्णत्वाला आणण्यासाठी महायुती सरकारच्या तिन्ही पक्षाचे एकमत होणे खूप महत्वाचे आहे. त्यानुसार सत्ताधारी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षात इच्छुकांची संख्या अधिक आहे.

परिणामी नावे निश्चितीचा प्रश्न तिन्ही पक्षाच्या प्रमुखांच्या दुष्टीने संवेदनशिल बनला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने बारामतीमधून विश्वासराव देवकाते यांच्या मागणीने जोर धरण्याचे रविवारी स्पष्ट झाले. बारामतीत राष्ट्रवादी भवन येथे कार्य़कर्त्यांशी संवाद मेळाव्यात अनेक धनगर समाज बांधवांनी राज्यपाल नियुक्त आमदारकीपदाची मागणी केली व पवार यांच्यापुढेच घोषणा बाजी केली. त्यामध्ये धनगर समाज बांधवांसह बारामती शहर, नीरावागज, मेखळी, खांडज, झारगडवाडी, शिरवली, माळेगाव, पणदरे आदी गावातील समर्थकांचा सहभाग होता.

यावेळी अजित पवार म्हणाले, राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी निश्चितीचा अधिकार राज्यपाल व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिपत्याखाली होणार आहे. महायुतीचे तीन पक्षाचे सरकार आहे. ठरवून दिलेल्या जागांचा निर्णय भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष पातळीवर एकत्रितरित्या होणार आहे. या आमदार पदासाठी महाराष्ट्रातून अनेकांची मागणी झालेली आहे. तशीच मागणी बारामतीत विश्वास देवकाते यांच्याकडून झाली आहे. आपल्या निवेदनचा आदर करतो व स्विकारतो आणि पक्षाच्या वरिष्ठ कमिटीपुढे मांडतो.`` असे आश्वासन उपस्थितांना त्यांनी दिले.

अजितदादांवर आमचा विश्वास..!

राज्यात धनगर समाजाची लोकसंख्या दोन कोटींच्या पुढे आहे. या समाजाचे आरक्षणासह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अशा प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या विश्वासराव देवकाते यांच्या सारख्या नेत्याची समाजाला गरज आहे. देवकाते यांनी बारामती नगर परिषदेचे नगर सेवक, माळेगाव साखर कारखाना संचालक, जिल्हा परिषद सदस्य ते अध्यक्ष भूषविले आहे.

त्या पार्श्वभूमिवर राज्यपाल नियुक्त आमदार पदी देवकाते यांची वर्णी लागवी, अशी धनगर समजाबांधवांची इच्छा आहे. आम्हाला विश्वास आहे की अजितदादा आमची मागणी मान्य करतील, अशी प्रतिक्रिया गुलाबराव देवकाते, अलिअसगर नगरवाला आदींनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT