Devendra fadnavis sakal
पुणे

Baramati News : बारामतीत भाजप कार्यकर्त्यांचा आणि अजित पवारांचा मिलाप अखरे फडणविसांनी घडविला

'बारामती तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या राजकिय समस्यांची गार्भियाने दखल घेतली आहे.

कल्याण पाचांगणे

माळेगाव - `बारामती तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या राजकिय समस्यांची गार्भियाने दखल घेतली आहे. तसेच संबंधितांनी तालुक्यात सुचविलेल्या विकास कामांचाही शासनस्तरावर विचार होण्यासाठी अजितदादांबरोबर स्वतंत्र बैठक घेतली जाईल.

परंतु लोकसभेच्या निवडणूकीत मतभेद बाजूला ठेवून एकादिलाने महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना मोठ्यामताधिक्याने निवडून द्यावे, शेवटी अजितदादांचा विजय म्हणजेच मोदीसाहेबांचा विजय असल्याचे भाजपच्या कार्य़कर्त्यांनी लक्षात ठेवावे,` असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचा आणि अजित पवारांचा मिलाप घडवून आणला.

बारामतीत भाजप नेतेमंडळींचे म्हणणे पुरंदर व इंदापूर तालुक्याप्रमाणे ऐका, अशी हाक भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी दिली होती. त्या पार्श्वभूमिवर देवेंद्र फडविणविस आणि अजित पवार यांनी पुण्यात बुधवार (ता. १७) रोजी रात्री उशीरा बारामतीमधील भाजप कार्यकर्त्यांची बैठक बोलविली होती.

त्यामध्ये दोन्ही तावरे, बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे, सुनिल पोटे, जी.बी.गावडे, पि.के. जगताप, युवराज तावरे, सतिश फाळके, अविनाश मोठे, प्रमोद तावरे, गोविंदराव देवकाते, राजेश कांबळे, नवनाथ पडळकर, धैर्य़शिल तावरे, अभिजित देवकाते आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बारामतीत शासनस्तरावर उपलब्ध होणाऱ्या विकास निधीमध्ये भाजप कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जावे, माळेगाव साखर कारखान्यात इथेनॉल प्रकल्प पाच लाख लिटर क्षमतेचा व्हावा व येथील कामगारांचा प्रलंबित प्रश्न सोडवावा, नीरा नदीचे प्रदुषण थांबवावे, वायनरी प्रकल्प नव्याने उभारावा, नीरा डावा कालव्याद्वारे शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळावे, मुळशी धरणातून (टाटा डॅम) दौंड व इंदापूर तालुक्यातील प्रत्येकी वीस गावे पाण्यासाठी प्रस्तावित आहेत.

त्या प्रक्रियेत बारामतीच्या जिरायती गावांचा विचार व्हावा, बारामतीमधील शासकिय वैद्यकिय महाविद्यालय पुऱ्याशा यंत्रसामुग्री उपलब्धता व्हावी, अशा विविध मुद्यांच्या आधारे रंजन तावरे यांनी देवेंद्र फडविसांचे लक्ष वेधले. याच वेळी तावरे व उपस्थितांनी महायुतीच्या सुनेत्रा पवार यांना विजयी करण्यासाठी आम्ही प्रमाणिकपणे काम करणार असल्याचे फडणविसांना सांगितले.

भाजपच्या नेतेमंडळींना बरोबर घेणार...

अजित पवार म्हणाले, `पंतप्रधान मोदीसाहेबांच्या हतात देशाचे उज्वल भवितव्य घडविण्याची धमक आहे. याचा विचार करून खरेतर भाजपबरोबर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बहुतांशी पदाधिकाऱ्यांना घेवून आलो. शेवटी तुम्ही मंडळी मोदीसाहेबांचे हात बळकट करत आहात, तेच काम आम्हीही करतो आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना बारामतीत विजयी करणे तुमचे आमचे काम आहे. हे होत असताना यापुढे भाजपच्या नेतेमंडळी व कार्यकर्त्यांना बरोबर घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटीबद्ध राहिल.`

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT