Baramati Constituency Lok Sabha Election Result Esakal
पुणे

Baramati Constituency Lok Sabha Election Result: बारामतीकरांची लेकीलाच पसंती; नणंद-भावजयीच्या हाय व्होल्टेज लढतीत सुप्रिया सुळेंची बाजी

अंकिता खाणे (Ankita Khane)

बारामती लोकसभा मतदारसंघात लागणाऱ्या निकालाकडे राज्यासह संपुर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच पार पडलेल्या या लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्यामुळे आणि एकाच घरातील सदस्यांमध्ये होणाऱ्या लढतीमुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. दरम्यान बारामतीकरांनी सुप्रिया सुळेंना पुन्हा एकदा संधी दिली आहे. या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आहे.

सुप्रिया सुळे - ७, ३२, ३१२

सुनेत्रा पवार - ५, ७३, ९७९

विजयी उमेदवाराचे मताधिक्य - १,५८, ३३३

यावर्षीची लोकसभा निवडणूक ही अनेक गोष्टींनी महत्त्वाची ठरली आहे. बारामती, जी फक्त पवारांच्या नावानं ओळखली जाते, तिथे पवारांच्याच घरातले या निवडणुकीत प्रतिस्पर्धी म्हणून समोरासमोर उभे ठाकले होते.

या निवडणुकीवेळी वाढत्या उन्हामुळे बारामती विधानसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. बारामती लोकसभेसाठी एकूण 59. 67 टक्के इतके मतदान झाले होते. सुप्रिया सुळे यंदा ‘चौकार’ ठोकणार, की भाजपचे ‘मिशन बारामती’ यंदा यशस्वी होणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

बारामती मतदारसंघाची रचना?

बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभांचा समावेश होतो. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर- हवेली, भोर, आणि खडकवासला हे सहा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात येतात. यामध्ये राष्ट्रवादीचे दोन, अजित पवार आणि दत्तात्रय भरणे, काँग्रेसचे दोन, संजय जगताप आणि संग्राम थोपटे आणि भाजपचे दोन, राहुल कुल आणि भीमराव तापकीर असे आमदार आहेत.

बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार

देशाचे लक्ष असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात २०१९पेक्षा यंदा एक लाख १४ हजार ७६१ ने मतदान केलेल्यांची संख्या वाढली आहे. ही वाढलेली मते कोणाच्या पारड्यात पडणार? यावरून खासदार कोण होणार हे ठरणार होते.

लोकसभा मतदारसंघात ५९.५० टक्के मतदान झाले होते. २०१९मध्ये या मतदारसंघात ६१.७ टक्के मतदान झाले होते. गतवेळेपेक्षा यंदा दीड ते पावणे दोन टक्क्यांनी मतदान कमी झाले होते. परंतु एक लाख १४ हजार ७६१ने मतदान करणाऱ्यांची संख्या वाढली होती. २०१९मध्ये १२ लाख ९६ हजार ८६० मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. यावर्षी संख्या १४ लाख ११ हजार ६२१ पर्यंत वाढली होती. त्यामध्ये सात लाख ७४ हजार ३८३ म्हणजे ६२.३५ टक्के पुरुष मतदारांनी मतदान केले; तर सहा लाख ३७ हजार २१९ म्हणजे ५६.३६ टक्के महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता.

मतदानाची टक्केवारी

मतदारसंघ २०१९ ..............२०२४

दौंड ६४.०५............६०.२९

इंदापूर ६४.३९............. ६७.१२

बारामती ७०.२४ .........६९.४८

पुरंदर ६०.४८ .........५३.९६

भोर ६०.८४ ...........६०.११

खडकवासला ५३.२०......... ५१.५५

एकूण ६१.५४............. ५९.५०

२०१९चे चित्र

भाजपच्या उमेदवार कंचन कुल यांचा त्यांनी 1,55,774 मतांनी पराभव केला आहे.

सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस) विजयी मते : ६,८६,७१४

कांचन कुल (भाजप) मते : ५,३०,९४०

नवनाथ पडळकर (वंचित) मते : ४४,१३४

मंगेश वनशिव (बसप) मते : ६८८२

विजयी उमेदवारांचे मताधिक्य : १,५५,७७४

आत्तापर्यंत कोणाचं राहिलं वर्चस्व

२००४ : काँग्रेस

२००९ : राष्ट्रवादी

२०१४ : राष्ट्रवादी

२०१९ : राष्ट्रवादी

Baramati Lok sabha Election

लोकसभा मतदारसंघात प्रभावी ठरलेले मुद्दे

पक्षफुटीचा मोठा फटका

मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी

दौंड, इंदापूर, पुरंदर व बारामतीच्या दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न

भोरमधील एमआयडीसीचा रखडलेला प्रश्न

कात्रज बोगदा ते चांदणी चौक मार्गे देहू रोडपर्यंत महामार्गावरील वाहतुकीची कोंडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT