Railway service sakal
पुणे

बारामती दौंड पुणे रेल्वे सेवा पूर्ववत करण्याची मागणी...

कोविडच्या संकटामुळे बंद केलेली ही सेवा आता दोन वर्षांचा कालावधी

- मिलिंद संगई

बारामती : गेल्या दोन वर्षांपासून कोविडमुळे (covid) बंद असलेली बारामती-दौंड-पुणे-बारामती ही रेल्वेसेवा (Railway service) पुन्हा सुरु करण्याची प्रवाशांची मागणी आहे. स्वस्त, सुरक्षित व सोयीची रेल्वेसेवा पूर्ववत झाल्यास प्रवाशांना दिलासा मिळेल, या बाबत प्रशासनाने पाठपुरावा करावा अशी बारामती व दौंडकरांची (Baramati and Daundkar) मागणी आहे. बारामतीहून दररोज सकाळी सात, सकाळी पावणेअकरा, दुपारी सव्वाचार व रात्री सव्वा दहा वाजता पॅसेंजर रेल्वे (Passenger train) दौंडला जाते. रात्रीच्या रेल्वेचा अपवाद वगळता इतर तीनही पॅसेंजर पुण्यापर्यंत धावतात त्या मुळे प्रवाशांची सोय होते.

बारामती ते दौंड या अंतरासाठी दहा रुपये तर बारामती ते पुणे या अंतरासाठी तीस रुपये तिकीटाचा दर असल्याने अनेकांना प्रवासासाठी अत्यंत स्वस्त पर्याय म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते. असे असताना कोविडच्या संकटामुळे बंद केलेली ही सेवा आता दोन वर्षांचा कालावधी होत आला तरी पुन्हा पूर्ववत झालेली नाही, त्या मुळे लोकांची मोठी गैरसोय होते आहे.

एसटीचा संप सुरु असतानाही रेल्वेसेवेची कमतरता प्रकर्षाने जाणवली. सर्व जनजीवन सुरळीत सुरु झालेले असताना रेल्वे सेवा पूर्ववत का केली जात नाही, असा लोकांचा प्रश्न आहे. वारंवार मागणी होऊनही ही सेवा पूर्ववत करण्याबाबत निर्णय घेतला जात नसल्याने लोक नाराज आहेत.

प्रवासी सेवा बंद असताना मालवाहतूकीची सेवा मात्र सुरळीत सुरु आहे. मालवाहतूकीपासून रेल्वेला महिन्याला साधारणतः दीड कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. सन 1994 मध्ये बारामतीच्या नॅरोगेज रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्यात आले. त्या नंतर संपूर्ण भारतात मालवाहतूकीपासून रेल्वेला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळू लागले आहे.

कालांतराने बारामती दौंड या रेल्वेमार्गाचे सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारामुळे या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरणाचेही काम पूर्ण झाले आहे. त्या मुळे या मार्गावरील रेल्वेचा वेगही वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Ram Naik : अलीकडच्या राजकारणात एकमेकांना नाव ठेवण्याची स्पर्धा : राम नाईक यांनी व्यक्त केली खंत

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

SCROLL FOR NEXT