बारामती : गेल्या दोन महिन्यांपासून बारामती नगरपालिकेला मुख्याधिकारीच मिळत नसल्याने नगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजावरही त्याचा परिणाम होऊ लागला आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेची वसूलीची स्थिती दयनीय असताना दोन महिने मुख्याधिकारीच नसल्याने आता शहरात हा चर्चेचा विषय बनला आहे.
गेल्या दहा दिवसांपासून बारामतीत एकीकडे कोविडची स्थितीही चिंताजनक बनू लागली आहे. ग्रामीण भागातील तपासण्यांची संख्या लक्षणीय असताना बारामती शहरातील तपासण्या खूपच कमी आहेत. स्वताः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाचण्यांची संख्या वाढविण्याच्या सूचना केलेल्या होत्या, मात्र यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बारामती नगरपालिकेस मुख्याधिकारी नसल्याने या बाबत उदासनिता आहे.
बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे 21 जून पासून बारामती नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यांना त्यांची महसूल विभागाची दैनंदिन कामे सांभाळून मुख्याधिकारीपदाचा अतिरिक्त ताण सहन करावा लागत आहे.वास्तविक बारामतीत मुख्याधिका-यांची नियुक्तीच होत नाही हाच चर्चेचा विषय आहे. खरोखरीच प्रशासकीय कारणामुळे ही नियुक्ती रखडली आहे की इतर काही कारण या मागे आहे याची शहरात चर्चा सुरु आहे.
वसूलीसह कोविडचे संकट गडद होऊ पाहत असल्याने बारामतीला पूर्णवेळ मुख्याधिकारी आवश्यक आहे. रस्तेदुरुस्तीसह नगरपालिकेशी संबंधित अनेक महत्वाचे विषय पूर्णवेळ अधिकारी नसल्याने मागे पडत आहेत. या पार्श्वभूमीवर लवकर बारामतीला मुख्याधिकारी मिळावा अशी मागणी होत आहे.
नगरपालिका फंडात खडखडाट...
वसूलीची स्थिती दयनीय असल्याने नगरपालिका फंडात खडखडाट निर्माण झाला आहे. सक्षम अधिकारीच नसल्याने नगरपालिकेच्या वसूलीच्या कामावरही त्याचा विपरीत परिणाम होतो आहे. विकासकामांवरही निधी नसल्याचा परिणाम जाणवणार असल्याने आता लवकर मुख्याधिकारी द्यावा अशी सर्वांचीच मागणी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.