बारामती - ज्याच्या नशीबाची दोरी बळकट असते, तो मृत्यूच्या दारात जाऊन परत येतो. बारामतीतील डॉक्टरांनीही अपघातातील एका रुग्णास अशाच प्रकारे देवदूत बनत जीवदान दिले.
1 जून रोजी तालुक्यातील लाटे सांगवी रस्त्यावर झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला होता. त्याला बारामतीतील लाईफ लाईन रुग्णालयात दाखल केले गेले.
अपघात गंभीर स्वरुपाचा होता, त्याच्यावर अतिदक्षता विभागात तातडीने उपचार सुरु झाले. अपघातात मेंदू, चेह-याची हाडे, मान, स्पाईनल कॉर्ड यांना मार लागून रुग्ण बेशुध्दावस्थेत होता. त्याला पक्षाघाताचा झटका बसला होता, तोंडात गंभीर जखमा होऊन जीभ तुटून बाहेर आली होती. चेह-याच्या हाडापासून गाल विलग झालेले होते. तीव्र रक्तस्त्रावामुळे श्वसनाला अडथळा येत होता.
डॉ. सचिन घोरपडे यांनी रुग्णाची परिस्थिती पाहून तातडीने उपचार सुरु केले. सर्जन डॉ.संदीप बर्गे हेही धावून आले, त्यांनी तात्पुरता रक्तस्त्राव बंद केला. डॉ. धनंजय माळशिकारे यांनी कौशल्याने कृत्रीम श्वासनलिका बसवून फुफुसात झालेला रक्तस्त्राव थांबविला. डॉ. घोरपडे यांनी औषधोपचार करुन त्याची प्रकृती स्थिर केली.
रुग्णाची गंभीर परिस्थिती पाहून रक्त थांबवण्याचे ऑपरेशन करण्यासाठी रुग्णास हलवणे धोकादायक असल्याचे सर्वच डॉक्टरांनी ओळखून जीभ, गाल जोडणे, घशातील रक्तस्त्राव थांबवणे अशा शस्त्रक्रिया अतिदक्षता विभागात करण्याचे ठरवले.
रुग्णाच्या चेहऱ्यातून गालातून व घशातून रक्तस्त्राव थांबविण्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. डॉक्टर व सहकारी यांनी केलेल्या परिश्रम व कौशल्यपूर्ण उपचाराने संबंधित रुग्णाची प्रकृती आता स्थिर आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.