Ajit Pawar esakal
पुणे

Ajit Pawar : सरकारी सेवेत रुजू झाल्यावर प्रलोभनाला बळी पडू नका

मिलिंद संगई,

स्पर्धा परीक्षातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी कायम अभ्यास करून वरिष्ठ पदांवर जाण्याची महत्वाकांक्षा कायम ठेवली पाहिजे.

बारामती - स्पर्धा परीक्षातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी कायम अभ्यास करून वरिष्ठ पदांवर जाण्याची महत्वाकांक्षा कायम ठेवली पाहिजे, सरकारी सेवेमध्ये रुजू झाल्यानंतर प्रलोभनाला बळी न पडता योग्य काम करावे, असा सल्ला विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज पोलीस भरती झालेल्या विद्यार्थ्यांना दिला.

विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत पोलीस दलात तसेच इतर शासकीय सेवेमध्ये स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी (ता. 29) सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी अजित पवार बोलत होते.

महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, सचिव अँड नीलिमा गुजर, विश्वस्त किरण गुजर, मंदार सिकची, डॉ. राजीव शहा, रजिस्ट्रार श्रीश कंभोज, प्राचार्य डॉ. भरत शिंदे, करिअर कट्टाचे समन्वयक डॉ. सुनील ओगले आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, या करिअर कट्ट्याच्या माध्यमातून आजवर 132 विद्यार्थी यशस्वीपणे उत्तीर्ण होत शासकीय सेवेत रुजू झालेले आहेत. या महाविद्यालयाच्या यशाची ही चढती कमान अशीच कायम ठेवा, त्यात सातत्य कायम राखा. या करिअर कट्टा सुरू करणाऱ्या सर्व प्राध्यापक प्राचार्य व त्यांच्या टीमचे, सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक विशाल चव्हाण व विशाल भोसले यांचे देखील अजित पवार यांनी कौतुक केले. त्यांनाही सन्मानित केले गेले.

डॉ. ओगले यांनी या उपक्रमाविषयी माहिती दिली, डॉ. शिंदे यांनी प्रास्ताविक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT