baramati half marathon great response supriya sule mary kom sport health Sakal
पुणे

Baramati Half Marathon : बारामती हाफ मॅरेथॉनला बारामतीकरांनी दिला उदंड प्रतिसाद...

कष्ट करण्याची तयारी असेल व परिश्रमांची जोड असेल तर यश संपादन करणे अवघड नसते, असे प्रतिपादन ऑलिंपिक विजेत्या मुष्टीयुध्दपटू मेरी कोम यांनी केले.

मिलिंद संगई, बारामती.

Baramati News : कष्ट करण्याची तयारी असेल व परिश्रमांची जोड असेल तर यश संपादन करणे अवघड नसते, असे प्रतिपादन ऑलिंपिक विजेत्या मुष्टीयुध्दपटू मेरी कोम यांनी केले. शरयू फाऊंडेशन व बारामती रनर्स यांच्या वतीने रविवारी (ता. 11) आयोजित करण्यात आलेल्या बारामती हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या पारितोषिकवितरण प्रसंगी त्या बोलत होत्या.

शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार, उद्योजक श्रीनिवास पवार यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. मेरी कोम यांच्या हस्ते, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत झेंडा दाखवून मॅरेथॉनचा प्रारंभ झाला. या वेळी सुप्रिया सुळे यांनीही फनरनमध्ये सहभागी होत मॅरेथॉनचा आनंद लुटला.

पारितोषिक वितरण समारंभास अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, चोला एम.एस.चे उपाध्यक्ष विवेक चंद्रा, सरव्यवस्थापक मन्सूर अली, राजीव देशपांडे, अजय पुरोहीत, कुणाल शर्मा,

उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर, पोलिस निरिक्षक दिनेश तायडे, बारामती रनर्सचे डॉ. वरद देवकाते, अमोल वाबळे, अँड. रोहित काटे उपस्थित होते.

ग्रामीण खेळाडूंना व्यासपीठ....

ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ व मैदान प्राप्त करून देणे त्याचप्रमाणे आरोग्याचा जनजागर करण्यासाठी बारामती हाफ मॅरेथॉनचा उपक्रम सुरु केला आहे- शर्मिला पवार, अध्यक्षा, शरयू फाऊंडेशन.

विजेते खेळाडू –(प्रथम, द्वितीय तृतीय या क्रमाने)

21 किलोमीटर (परदेशी खेळाडू पुरुष)- अडणीव टोलेसा, एकेले निगुसे, मगासे सोरा.

21 कि.मी. (परदेशी महिला खेळाडू)- हिलंडा तनई, बिर्गिड किमतवाई

21 कि.मी. पुरुष (खुला गट)- अंकुश हालके, मनीष राजपूत, विशाल गंभीरे.

21 कि. मी. स्त्री (खुला गट)- राणी मचनंदी, आकांक्षा शेलार, वैष्णवी मोरे

10 कि.मी.- पुरुष- सुनील कुमार, महादेव कोळेकर कृपाशंकर यादव

10 कि. मी.महिला- प्राजक्ता शिंदे, सुरेखा मदने, दीक्षा लोणार

जवळपास सहा हजार स्पर्धकांनी ही स्पर्धा पूर्ण केली. शुभम निंबाळकर यांनी प्रास्ताविक केले. अनिल रुपनवर, चैतन्य राठी यांनी सूत्रसंचालन केले व डॉ. पी. एन देवकाते यांनी आभार मानले.

आफ्रिकन खेळाडू पेक्षा भारतीय खेळाडूंनी या वेळेस बाजी मारली तर हरियाणा मधील 65 वर्षीय भजनलाल व त्यांचा मुलगा 32 वर्षीय हरभजन या पिता पुत्राच्या जोडीने स्पर्धा पूर्ण केली. त्या नंतर त्यांनी भांगडा करुन आनंद व्यक्त केला. काही महिलांनी थेट नऊवारी घालून स्पर्धेत भाग घेतला.

मी पुन्हा येईन ....

प्रापंचिक जबाबदारी सांभाळून सराव केला, पतीने सहकार्य दिले, ऑलम्पिकमध्ये सुवर्णपदकाचीच जिद्द होती, मात्र कांस्यपदकावर समाधान मानावे लागले ही खंत आहे. सराव शिवाय यश नाही.

बारामतीचे वातावरण, पर्यावरण व नियोजन खूप छान आहे, मला पुन्हा बारामतीला यायला आवडेल- मेरी कोम, ऑलिंपिक विजेती मुष्टीयुध्दपटू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT