Pravin Mane join Ajit Pawar group esakal
पुणे

Pravin Mane join Ajit Pawar group: निवडणुकीपुर्वी सुप्रिया सुळेंना धक्का! प्रवीण मानेंनी सोडली साथ, स्वत:च केलं स्पष्ट

Pravin Mane join Ajit Pawar group: निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंना मोठा धक्का बसला आहे. सुप्रिया सुळे यांचे प्रचार प्रमुख असलेले प्रवीण माने यांनी आज अजित पवार गटामध्ये सहभागी होत असल्याचे जाहीर केले आहे.

संतोष आटोळे

निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंना मोठा धक्का बसला आहे. सुप्रिया सुळे यांचे प्रचार प्रमुख असलेले प्रवीण माने यांनी आज अजित पवार गटामध्ये सहभागी होत असल्याचे जाहीर केले आहे. दोन दिवसांपुर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण माने यांची भेट घेतली होती, त्यानंतर ते महायुतीसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

दरम्यान आज प्रवीण माने यांनी पत्राकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बळकटीकरणासाठी, इंदापूरच्या विकासासाठी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रह यामुळे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी दिली आहे.

इंदापूर येथील माने परिवाराच्या सोनाई निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषद मध्ये प्रवीण माने बोलत होते. यावेळी बोलताना प्रवीण माने म्हणाले, आज पासूनच महायुतीचा प्रचाराला सुरवात करणार आहे. सुनेत्रा वहिनींनी अनेक कामे केली आहेत. फोरमच्या माध्यमातून लाखो गोर गरीबांची नेत्र तपासणी, बारामती टेक्सटाइल पार्कच्या माध्यमातून नोकऱ्या देण्याचे काम केले. यामुळे अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादीत जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान प्रवीण माने यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीला बळ मिळाले असल्याचे बोलले जाते आहे. दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माने यांच्या निवासास्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर ते महायुतीसोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या.

प्रविण मानेंच्या भेटीवर काय म्हणाले फडणवीस?

देवेंद्र फडणवीस यांची प्रविण माने यांच्या भेटीनंतर फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “प्रविण माने यांच्यांशी माझे खूप जुने संबंध आहेत. वैयक्तिक संबंध आहेत. ते अनेकवेळा माझ्या घरी येतात. ते बऱ्याच दिवसांपासून माझ्या मागे लागले होते की, इंदापुरात तुम्ही येता पण माझ्याकडे येत नाहीत. त्यामुळे मी कबूल केलं होती की, मी तुमच्याकडे चहा प्यायला येईल. त्यामुळे मी त्यांच्याकडे चहा प्यायला गेलो होतो. ते आमच्यासोबतच आहेत. आमचे जुने सहकारी आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: आज शेअर बाजार राहणार बंद; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही ट्रेडिंग होणार नाही

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीचा भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

Sweet Potato Patties: सकाळी नाश्त्यात बनवा चटपटीत रताळं पॅटिस, जाणून घ्या रेसिपी

Congress : समाजात फूट पाडण्यासाठीच भाजपने कलम 370 चा मुद्दा जिवंत ठेवलाय, खर्गेंचा हल्लाबोल

Satara Assembly Election : संदेश, रिल्स पाहताना सावधानता बाळगा...एपीके फाइलवर क्लिक नको, अन्यथा बँक खाते होईल रिकामे

SCROLL FOR NEXT