MP Supriya Sule sakal
पुणे

MP Supriya Sule : शरद पवार संपवणे एवढं सोप नाही

साखर गावामध्ये सभेत खासदार सुप्रिया सुळे यांची भाजपवर सडकून टीका.

मनोज कुंभार

वेल्हे, (पुणे) - 'आम्ही नुसते जय श्रीराम म्हणत नाही तर आम्ही मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम म्हणतो' आम्ही मर्यादा राखूनच सुसंस्कृत राजकारण व समाजकारण करतो. आमची लढाई वैचारिक असून लोकशाहीमध्ये विरोधक असला पाहिजे नसेल तर ती दडपशाही मानली जाते. आणि ही दडपशाहीची भाषा भाजपच्या माध्यमातून केली जात असून, बारामती मध्ये येऊन शरद पवार यांना संपवण्याची भाषा केली जाते.

ही भाषा कोणत्याही सुसंस्कृत पक्षाला शोभत नाही परंतु शरद पवार संपवणे एवढे सोपे नाही अशा दडपशाहीला आम्ही भीक घालत नाही. अशी सडकून टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्यावरती केली.

किल्ले राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या साखर (ता. राजगड) येथे आज मंगळवार (ता. १६) रोजी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे प्रचारानिमित्त आयोजित सभेमध्ये बोलत होत्या पुढे बोलताना त्या म्हणाल्या, 'महाराष्ट्रामध्ये गलिच्छ राजकारण चालले असून धमक्या देणे विरोधकांना संपवण्याची भाषा सुरू आहे.

माझ्या मतदारसंघांमध्ये बाहेरील जिल्ह्यामधील काही माणसे माझ्याविरुद्ध प्रचारासाठी फिरत असल्याची माहिती मिळत आहे.त्यामुळे विरोधकांना त्यांच्या कार्यकर्त्यांवर विश्वास नसल्याने भाडोत्री माणसांकडून प्रचार करण्याची वेळ आली आहे. माझा माझ्या कार्यकर्त्यांवरती पूर्ण विश्वास असून ते निष्ठेने काम करत आहेत.

दरम्यान संग्राम थोपटे म्हणाले,' पवार साहेबांचे बोट धरून अनेकांनी राजकारणात प्रवेश केला राजकारणात अनेक पदे मिळाली. साहेब ,सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून विकास निधी आणला गेला. गावोगाव विकास झाला आणि आत्ता तेच पंधरा वर्षात काय विकास झाला असा सवाल करत आहेत. याचबरोबर थोपटे यांनी विजय शिवतरे यांच्यावर टीका करत एका रात्रीत त्यांना काय साक्षात्कार झाला त्यांना तलवार म्यान करावी लागली, असे म्हणत ते पुरंदरचे पलटूराम आहेत.

यावेळी मानसिंग धुमाळ, शंकरराव भुरुक, दिनकर धरपाळे, दिनकर सरपाले, अमोल नलावडे, शोभाताई जाधव, संतोष रेणुसे, नाना राऊत, सीमा राऊत, संदीप नगीने, सुवर्णा राजीवडे, प्रकाश बडे, शिवराज शंकर, गणेश जागडे, शैलेंद्र वालगुडे, दीपक दामगुडे, हनुमंत कार्ले, गोरख भुरुक, रमेश शिंदे, दुर्गा चोरगे, सुधीर रेणूसे, आदींसह महाविकास आघाडीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाषणातील ठळक मुद्दे

  • सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी करणार.

  • शेतकऱ्यांशी निगडित असणाऱ्या वस्तूंवरील जीएसटी शून्यावर आणणार.

  • दरवर्षी एसटी परिवार सेवा सुधारण्यासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली जाणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwa: केजरीवालांना मोठा धक्का! दिल्ली सरकारच्या मंत्र्याने दिला राजीनामा; भाजपचं नाव घेत पक्षावर आरोप

बापाच्या जिवावर कॉन्‍ट्रॅक्‍टर झालेल्या नारळफोड्याने माझ्यासमोर उभं राहून दाखवावं; आमदार गोरेंचा कोणाला इशारा?

बाप'माणूस! सरकारी रुग्णालयातील अग्निकांडात याकूबने परक्यांच्या बाळांना वाचवले, मात्र आपल्या जुळ्या मुली गमावल्या...

Chh. Sambhajinagar Crime : नऊ तोळे सोने मोडले दुसऱ्याच्या नावाने, यशस्विनी पतसंस्थेच्या घोटाळ्याची न्यायालयात माहिती

'Rishabh Pant ला हॉस्पिटलमध्ये पाहिलं तेव्हा वाटलं परत क्रिकेट...', रवी शास्त्रींनी सांगितली आठवण

SCROLL FOR NEXT