Aditya Thackeray sakal
पुणे

Aditya Thackeray : 'ज्यांनी दिली साथ त्यांचा केला घात, अशी भाजपाची वृत्ती

उद्धव ठाकरे, शदर पवार स्वतःसाठी लढत नसून केवळ माझा महाराष्ट्र, माझा देश आणि या देशाचे संविधानाचे काय होणार या विचाराने काम करताहेत.

सकाळ वृत्तसेवा

पिरंगुट - 'ज्यांनी दिली साथ त्यांचा केला घात, अशी भाजपाची वृत्ती झालीय. उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन भाजपाने शिंदेना गाठले. शिंदेना जेलमध्ये टाकायचे होते. त्यामुळे शिंदे मातोश्रीवर येऊन रडले. पण त्यांनीही घात केला.

उद्धव ठाकरे, शदर पवार स्वतःसाठी लढत नसून केवळ माझा महाराष्ट्र, माझा देश आणि या देशाचे संविधानाचे काय होणार या विचाराने काम करताहेत. जो या महाराष्ट्राचा अपमान करीन त्याला हा महाराष्ट्र आडवा केल्याशिवाय राहणार नाही. डॅा. बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान भाजपाला नको आहे त्यामुळे हे संविधान त्यांना बदलायचे आहे. त्यातूनच जॅाईन ऑर जेलची पॅालिसी भाजपाने अवलंबली आहे.

शेतकरी विरोधी असलेल्या भाजपाला मतदान करू नका. या सरकारने राज्यातील उद्योग गुजरातला पाठविले. नवीन उद्योग महाराष्टात आणले नाहीत. भ्रष्टाचारी लोकांना सरकारमध्ये मंत्रीपदे दिली. काळा पैसा, प्रत्येकाच्या खात्यात पैसे, दुपटीचे उत्पन्न, प्रधानमंत्री आवास योजना यांसारखी आश्वासने पूर्ण होऊ शकलेली नाहीत.

इंडिया आघाडी म्हणजे क्रिकेट टीम आहे. राहुल नार्वेकरांनी पक्षांबाबतचा दिलेला निकाल म्हणजे संविधानाला लागलेली पहिली ठेच आहे. हे सरकार सत्तेत आले तर संविधान बदलले जाईल. येत्या चार जूनला इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत येणार असून अबकी बार भाजपा तडीपार, अशी अवस्था होणार आहे. 'अशा शब्दांत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकार व भाजपावर टीका केली.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारानिमित्त महाविकास आघाडीच्या वतीने घोटावडे फाटा (ता. मुळशी) येथील चौकात आयोजित केलेल्या जाहीर सभेत ठाकरे बोलत होते. यावेळी अतुल लोंढे, जयदेव गायकवाड, जगन्नाथ शेवाळे, नाना नवले, संग्राम थोपटे, रोहित पवार, सचिन आहिर, तुषार कामठे, शंकर मांडेकर, संतोष मोहोळ, सचिन खैरे, गंगाराम मातेरे, सविता दगडे, शालिनी देशपांडे, संगीता पवळे , स्वाती ढमाले, दगडु करंजावणे, बाबाजी शेळके, राहुल पवळे, निकिता सणस, निकिता रानवडे आदी उपस्थित होते.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'ही लढाई वैयक्तिक नसून मराठी स्वाभिमानाची आहे. दिल्लीचे तख्त आणि अदृश्य शक्ती विरोधातील आहे. सध्या दडपशाहीचे राजकारण चालू आहे. अनेक जण मला वैयक्तिक फोन करून सांगतात की, ताई आम्हाला पुढे येता येत नाही. मुळात मी या मिंधेचा शिवसेना पक्षच समजत नाही. उद्धव ठाकरेच शिवसेनेचे खरे अध्यक्ष समजते.

यावेळी शिवसेनेने मोठी ताकद माझ्या पाठीशी असून शिवसेना आणि कॅांग्रेसचा चांगला परफॅार्म आहे. सध्याचे सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम केले आहे. आरक्षण, महागाई, भ्रष्टाचार, उद्य़ोग या सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहे. जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत आम्ही संविधान बदलू देणार नाही. आमच्या पक्षांना भ्रष्टाचारमुक्त केल्याबद्दल भाजपाचे आभार. यावेळी सेवा, सन्मान आणि स्वाभिमान यांसाठी मला मतदान करा.'

यावेळी नाना नवले म्हणाले, 'मुळशीचा विकास शरद पवार यांनी केला असून उपकारकर्त्याला विसरले जाते ही खेदाची बाब आहे. 'संग्राम थोपटे म्हणाले, 'वस्तादाचा पराभव कसा शक्य आहे. त्यामुळे यावेळी मतदार मात्र विरोधकांच्या धुऱ्या वर करणार आहे. भोर मतदार संघातून सुप्रिया सुळे या पन्नास हजारांच्या फरकाने निवडून येतील. यावेळी चारशे पार ऐवजी मुळा मुठा नदी पार अशी भाजपाची अवस्था असेल.

मुळशीला पर्यटनाचा दर्जा मिळवून देण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी संसदेत हा प्रश्न विषय मांडावा. 'यावेळी रोहित पवार, अतुल लोंढे, जयदेव गायकवाड, गंगाराम मातेरे यांचीही भाषणे झाली. तालुका राष्ट्रवादी कॅांग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी प्रास्ताविक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : मुंबई, पुण्यासह काही शहरात आज ढगाळ वातावरण; राज्यातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

SCROLL FOR NEXT