Reshma Punekar 
पुणे

Reshma Punekar : लहानपणी बकऱ्‍या चारणारी बारामतीची रेश्मा बनली भारतीय बेसबॉल संघाची कर्णधार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लहानपणापासून बकऱ्‍यांमागे काठी घेऊन धावणारी, बारामतीची रेश्मा शिवाजी पुणेकर हिची भारतीय बेसबॉल महिला संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. त्यानिमित्ताने दुर्गम प्रतिष्ठानतर्फे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर येथे रेश्माचा सत्कार व सन्मान करण्यात आला.

या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार जाधव, डॉ. प्रसाद खंडागळे, दत्त मंदिराचे विश्वस्त राजेंद्र बलकवडे, रवी पठारे, विनोद येलारपूरकर, संजय दळवी यांसह मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास जेजुरी देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष डॉ. प्रसाद खंडागळे यांचे सहकार्य मिळाले. याप्रसंगी हाँगकाँग येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी रेश्माला ३५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. तसेच, प्रतिष्ठानचे सल्लागार रवी जाधव यांनी १० हजार रुपयांची मदत केली.

रेश्माने अत्यंत संघर्षाने आजपर्यंत दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. याचबरोबर तब्बल २३ राष्ट्रीय सामन्यांमध्ये महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व केले असून, २८ राज्यस्तरीय सामने खेळले आहेत. रेश्माने आतापर्यंत सर्व स्तरांवरील बेसबॉल स्पर्धांमध्ये चार सुवर्ण, सहा रौप्य व तीन कांस्य पदके मिळविली आहेत. तसेच, महाराष्ट्राची सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून तिला पुरस्कार मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कणकवली मतदारसंघात पहिल्‍या फेरीत भाजपचे नितेश राणे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT