Baramati Crime News esakal
पुणे

Baramati Crime: दोन कुटुंबातील रस्त्याचा वाद मिटत नसल्याने बारामतीत शेतकऱ्याने घेतले पेटवून

सकाळ डिजिटल टीम

बारामती: शहरातील प्रशासकीय भवनाच्या दारात आज एका शेतकऱ्याने स्वताःच्या अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेतले. या घटनेत संबंधित शेतकरी बारा टक्के भाजला असल्याची प्राथमिक माहिती असल्याचे पोलिस निरिक्षक सुनील महाडीक यांनी सांगितले.

रोहिदास जनार्दन माने (रा. रेडणी, ता. इंदापूर) असे संबंधित शेतकऱ्याचे नाव असून पुढील उपचारासाठी त्यांना महिला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. (Latest Marathi News)

दोन कुटुंबात रस्त्यावरुन वाद आहे. या प्रकरणात या पूर्वीही इंदापूरच्या तहसिलदारांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता. या बाबत 4 मे रोजी उपोषणही संबंधितांनी केले होते, ते उपोषण 7 मे रोजी माघारी घेण्यात आले होते.

या बाबत इंदापूरचे तहसिलदार व बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्यासमवेत अनेकदा बैठकाही झालेल्या होत्या. दोन कुटुंबातील रस्त्यावरुनचा हा वाद असून तो सुटण्यासाठी प्रशासनही प्रयत्न करत होते, असे वैभव नावडकर यांनी स्पष्ट केले आहे.

आज दुपारच्या सुमारास रोहिदास माने यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत स्वताःला पेटवून घेतले. मात्र लोकांनी तातडीने त्यांच्या अंगावरची आग विझविल्याने त्यांना अधिकचे भाजलेले नाही, असे पोलिसांनी सांगितले.

क्षणार्धात हा प्रकार घडल्याने या परिसरात काही काळ खळबळ माजली होती. दरम्यान वैभव नावडकर व सुनील महाडीक यांनी घटनास्थळी भेट देत संबंधित शेतक-यावर उपचार होण्यासाठी कार्यवाही केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी: रोहित शर्मा पहिल्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियात होतोय दाखल, सोबत भारी गोलंदाजही टीम इंडियाच्या मदतीला येतोय

'राष्ट्रवादी फुटीनंतर पक्ष सोडून गेलेल्‍या गद्दारांना पाडाच'; शरद पवारांचा अजितदादांच्या आमदारांना इशारा

Ajit Pawar: पार्थ पवार म्हणतात, भाजप-शिवसेनेसोबत गेल्याने आम्ही बदलणार नाहीत; आम्ही तर...

Fraud Calls : अलर्ट! या नंबरवरुन येणारे कॉल आहेत धोक्याचे; क्षणात होऊ शकतो मोबईल हॅक अन् अकाउंट रिकामं

Devendra Fadnavis : महाविकास आघाडीकडून व्होट जिहादचे काम, आता एक व्हावे लागेल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT