baramati rain news water stuck in road traffic jam heavy rain monsoon 2023 sakal
पुणे

Baramati Rain News : बारामतीत अनेक ठिकाणी रस्त्यावर साचले गुडघाभर पाणी….

पाण्यामध्ये काही दुचाकी वाहने बंद पडली, तर चार चाकी वाहनांच्या इंजिनमध्ये देखील पाणी गेल्याच्या घटना

मिलिंद संगई, बारामती.

बारामती : शहरात रविवारी (ता.3) झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानंतर शहरातील अनेक भागात गुडघाभर पाण्याची तळी साचली होती. या पाण्यातून मार्गक्रमण करताना बारामतीकरांची मोठी कसरत झाली. या पाण्यामध्ये काही दुचाकी वाहने बंद पडली, तर चार चाकी वाहनांच्या इंजिनमध्ये देखील पाणी गेल्याच्या घटना घडल्या.

दरवर्षी पावसाळ्यामध्ये बारामती शहरातील विविध रस्त्यांवर पाण्याची तळी साठतात, मात्र पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाही. मोठा पाऊस पडल्यानंतर शहरातील काही ठराविक ठिकाणी पाणी साचून राहते. या पाण्याचा निचरा लवकर होत नाही, त्यामुळे या पाण्यातून वाट काढताना पदाचारी व दुचाकी चालकांची मोठी कसरत होते.

रविवारी देखील दुपारी चार ते साडेपाच या काळात झालेल्या पावसानंतर भिगवण रस्त्यावरील अनेक ठिकाणी पाण्याची तळी साचली होती. श्रीराम नगर चौक तसेच दत्त बेकरी नजीक गुडघाभर पाणी साचून राहिले होते. कोर्ट कॉर्नर तसेच पंचायत समिती समोरील काही भागात देखील पाण्याची तळी साचली होती. शहरात अनेक भागात असेच पाणी रस्त्यावर साठवून राहत आहे. या संदर्भात नगरपालिकेने या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करावी अशी बारामतीकरांची मागणी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT