Sakal Vidya Education Expo 2023 sakal
पुणे

Sakal Education Expo : विद्यार्थी कशात घडविणार भवितव्य? बारामतीत आजपासून मार्गदर्शनाची संधी

‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२३’ चे शनिवारी (ता. १०) व रविवार (ता. ११) रोजी बारामतीत आयोजन

सकाळ वृत्तसेवा

बारामती - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने आचार्य ॲकॅडमी प्रस्तुत आणि एस. बी. पाटील विकास प्रतिष्ठान इंदापूर तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने आयोजित ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२३’ चे शनिवारी (ता. १०) बारामतीत सकाळी अकरा वाजता उद्‍घाटन होणार आहे.

या दोनदिवसीय एक्स्पोमध्ये विद्यार्थ्यांना परिपूर्ण मार्गदर्शनासह विविध विषयांची माहिती देणारी चर्चासत्र होणार असून, पालकांनाही करिअरबाबत माहिती दिली जाणार आहे. विविध क्षेत्रात विद्यार्थी कशात भवितव्य घडवू शकतात, याची सखोल माहिती येथे उपलब्ध होणार आहे. भिगवण रस्त्यावरील चिराग गार्डन येथे शनिवारी (ता. १०) दुपारी साडेचार वाजता आचार्य ॲकॅडमीचे संस्थापक संचालक ज्ञानेश्वर मुटकुळे हे ‘परिवर्तनाचे साधन- शिक्षण’ या विषयावर विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्या पाठोपाठ संध्याकाळी पाच वाजता करिअर मार्गदर्शक हेमचंद्र शिंदे हे ‘दहावी-बारावीनंतर करिअरच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी एस. बी. पाटील शैक्षणीक संकुल सुरु केले. त्यात हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे धडे गिरवले आहेत. इंजिनिअरिंग कॉलेजमधून तीन हजारांहून अधिक मुले इंजिनिअर झाली आहे. अनेकांनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे. एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमधून मुले-मुली शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. एस. बी. पाटील शैक्षणीक संकुलामध्ये नव्याने फार्मसी कॉलेज सुरु होत असून, डी.फार्म व बी.फार्म.चे शिक्षण सुरु होणार आहे. एस. बी. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचा नॅकचा अ दर्जा आहे.

- अंकिता पाटील-ठाकरे, उपाध्यक्ष, शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान

दहावी-बारावीच्या परीक्षा संपताच घराघरात विद्यार्थ्यांचे करिअर, पुढील शिक्षण याविषयी चर्चा सुरू होते. आज उच्च शिक्षणाला स्पेशलायझेशन, स्किल बेस्ड लर्निंग, तसेच मल्टी डिसिप्लिनरी अॅप्रोच या महत्त्वाच्या घटकांची जोड मिळाली आहे. अशा प्रकारचे शिक्षण देण्याचे काम डेलोनिक्स सोसायटीमार्फत केले जाते.

- डॉ राजेंद्र पाटील, प्राचार्य, डेलोनिक्स सोसायटीचे बारामती कॉलेज ऑफ फार्मसी, बऱ्हाणपूर

कोविडच्या संकटानंतर हॉटेल इंडस्ट्रीला चांगले दिवस येत आहेत. या इंडस्ट्रीला कुशल मनुष्यबळ नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेत बारामतीत हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम सुरु केला आहे. शिक्षणासोबतच एक वर्षांचे प्रशिक्षण देखील दिले जाते. एक वर्ष सर्टिफिकेट कोर्स उपलब्ध करून दिला असून, हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या असंख्य संधी आहेत. व्यक्तिमत्त्व विकास व संभाषण कौशल्याचेही प्रशिक्षण येथे दिले जाते. या कोर्समुळे एअरलाईन्स, क्रुज, हॉस्पिटल, कार्पोरेट सेक्टरमध्ये संधी मिळू शकतात.

- प्रसाद शेट्टी, संचालक, टेल्व्ह सॉईल स्कूल ऑफ मॅनेजमेंट, बारामती

फक्त शिकवत नाही, तर तयारी करूनच घेतो, या ब्रीद वाक्याला प्रत्यक्षात उतरवून आजच्या स्पर्धेच्या युगात गुणवत्तेशी कसलीही तडजोड न करता विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाला महत्त्व देणारा पॅटर्न म्हणजेच राज पॅटर्न. या गुणवत्तेचा साक्षीदार म्हणून आमच्या पॅटर्नचा इयत्ता आठवीतील विद्यार्थी सोहम रमेश शिंदे हा सैनिकी स्कूल परिक्षेत देशात तिसरा व एन.एम.एस.मध्ये राज्यात पहिला येतो, हाच आमच्या यशाचा झेंडा ठरतो.

- डॉ. शिवाजी मोरे, संचालक, राज पॅटर्न, बारामती

ग्रामीण भागातील मुलांना परदेशात शिक्षण देणे पालकांना शक्य व्हावे, या उद्देशाने बारामती सहकारी बँकेने विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मार्गदर्शनानुसार शैक्षणिक कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली. मोजकी कागदपत्रे व त्वरित कर्जमंजुरी, ही या योजनेची वैशिष्ट्ये आहेत. माफक व्याजदर असल्याने या सुविधेचा लाभ पालकांनी आवर्जून घ्यायला हवा. केजी टू पीजी शिक्षणासाठीसुद्धा बँकेकडून शैक्षणिक कर्जाची सुविधा उपलब्ध आहे.

- सचिन सातव, अध्यक्ष, बारामती सहकारी बँक

ॲनिमेशन या क्षेत्रात प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात नोकरीच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. कमी वेळात मिळणारे प्रशिक्षण व नोकरीच्या संधी, तसेच चांगल्या पगाराचे पॅकेज मिळत असल्यामुळे विद्यार्थीचा कल अॅनिमेशन करीअरकडे वाढला आहे.

- रणजित शिंदे, संचालक, तिरंगा कॉलेज ऑफ डिझाईन, बारामती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT