Sakal Vidya Education Expo 2024 sakal
पुणे

Sakal Viday Education Expo : बारामतीत आजपासून 'सकाळ एज्युकेशन एक्स्पो'चे आयोजन

दहावी-बारावीनंतरच्या शिक्षण व करियरच्या संधींबाबत मिळणार मार्गदर्शन.

सकाळ वृत्तसेवा

बारामती - जीवनात करिअर घडविण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या आणि शिक्षणाच्या विविध संधींची माहिती एकाच दालनात उपलब्ध करून देणाऱ्या सकाळ माध्यम समूहाच्या सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पोचे उद्‍घाटन शुक्रवारी (ता. ७) दुपारी बारा वाजता होत आहे.

बारामतीतील भिगवण रस्त्यावरील ‘मुक्ताई लॉन्स’ येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हे उद्‌घाटन होणार आहे. बारामतीत अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट प्रायोजित व १७२९ आचार्य ॲकॅडमी प्रा. लि. प्रस्तुत ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२४’चे ७, ८ व ९ जून रोजी आयोजन केले आहे.

या एक्स्पोचे सहप्रायोजक पेस आय आय टी अँड मेडीकल बारामती असून, सहयोगी प्रायोजक दत्तकला शिक्षण संस्था भिगवण व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. सर्वच विभागातील दहावी बारावीनंतरच्या शिक्षण व करिअरच्या संधीबाबत या एक्स्पोमध्ये परिपूर्ण मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

वि‌द्यार्थ्यांच्या आयुष्यातील दहावी-बारावी ही वर्षे भविष्य बदलविणारी असतात. परीक्षेत मिळालेले गुण एखाद्या करिअर कोर्समध्ये प्रवेश मिळवून देऊ शकतील, परंतु उत्तम करिअर घडवू शकतील का? हे सांगता येत नाही. स्वतःच्या नैसर्गिक क्षमता जाणून घेऊन योग्य करिअरची निवड करणे, त्याला अनुरूप शिक्षण घेणे, हेच यशस्वी करिअरचे सूत्र आहे. दिशा अॅकॅडमी हेच काम प्रत्येक वि‌द्यार्थ्यांसाठी करीत आहे. ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’च्या माध्यमातून एकाच छताखाली विद्यार्थ्यांची उज्ज्वल भविष्य घडविणारी अनेक दालने आहेत विद्यार्थी व पालकांनी याचा लाभ घ्यावा.

- प्रा. डॉ. नितीन कदम, अध्यक्ष, दिशा अॅकॅडमी प्रा. लि.

दहावी-बारावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेताना करिअरची नेमकी दिशा ठरविण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘सकाळ’च्या वतीने आयोजित ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’ दिशादर्शक आहे. यात विविध अभ्यासक्रमांच्या माहितीसह करिअरच्या संधींची माहिती विद्यार्थ्यांसह पालकांना एकाच छताखाली विनामूल्य मिळणार आहे. तज्ज्ञ, अभ्यासक शिक्षण संस्था प्रतिनिधींशी संवाद साधता येणार आहे. उच्च शिक्षणासाठी आर्थिक अडचणी असलेल्यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे शैक्षणिक कर्ज अत्यल्प व्याजदरात उपलब्ध आहे. याबाबतही या एक्स्पोमध्ये मार्गदर्शन मिळेल.

- प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंक

आजचे सेमिनार

  • मार्गदर्शक- डॉ. एस. व्ही. महामुनी

  • विषय -कला, वाणिज्य व विज्ञानाच्या करियरच्या संधी. वेळ- दु. ४ वा.

  • मार्गदर्शन- डॉ. हेमचंद्र शिंदे.

  • विषय- दहावी व बारामतीनंतर करियरच्या संधी. वेळ- सायं. ५ वा.

काय, केव्हा, कधी, कुठे?

  • काय - सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२४

  • कधी - शुक्रवार ता. ७ ते रविवार ९ जून २०२४

  • केव्हा - सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत

  • कुठे - मुक्ताई लॉन्स, सिटीईन चौक, सूर्यनगरी, बारामती.

अधिक माहितीसाठी संपर्क

  • दत्तात्रेय : ८९७५६७३३१०

  • रमेश : ८२०८५३९९४२

सहभागी संस्था

  • ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती

  • १७२९ आचार्य अँकेडमी बारामती

  • पेस आयआयटी अँड मेडीकल बारामती

  • पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

  • दत्तकला शिक्षण संस्था स्वामी चिंचोली

  • पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट निगडी

  • श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ सोमेश्वरनगर

  • दिशा ॲकॅडमी बारामती

  • शिवनगर विद्या प्रसारक मंडळ माळेगाव

  • तिरंगा कॉलेज ऑफ ॲनिमेशन अँड व्हीएफएक्स बारामती

  • विद्या प्रतिष्ठान इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बारामती

  • एक्सलेन्स सायन्स ॲकॅडमी बारामती

  • लडकत सायन्स ॲकॅडमी बारामती

  • बन्सल क्लासेस प्रा. लि. बारामती

  • एम.आय.टी. आळंदी

  • बारामती कॉलेज ऑफ फार्मसी

  • एफ.यु.ई.एल. बिझनेस स्कूल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Parkash Ambedkar : सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, ते म्हणाले...

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : जम्मूमध्ये अतिक्रमणविरोधी मोहीम

SCROLL FOR NEXT