Baramati Bus Depo sakal
पुणे

Baramati Bus Depo : बारामतीचे सर्वांगसुंदर बसस्थानक येतेय आकारास

राज्यातील सर्वात सुंदर व प्रशस्त बसस्थानक बारामतीत वेगाने आकारास येत असून एखाद्या विमानतळाच्या धर्तीवर हे बसस्थानक उभारलेले असून लवकरच बारामतीकरांना या बसस्थानकाचा वापर करता येणार आहे.

मिलिंद संगई,

राज्यातील सर्वात सुंदर व प्रशस्त बसस्थानक बारामतीत वेगाने आकारास येत असून एखाद्या विमानतळाच्या धर्तीवर हे बसस्थानक उभारलेले असून लवकरच बारामतीकरांना या बसस्थानकाचा वापर करता येणार आहे.

बारामती - राज्यातील सर्वात सुंदर व प्रशस्त बसस्थानक बारामतीत वेगाने आकारास येत असून एखाद्या विमानतळाच्या धर्तीवर हे बसस्थानक उभारलेले असून लवकरच बारामतीकरांना या बसस्थानकाचा वापर करता येणार आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामतीत जुने बसस्थानक पाडून त्या जागी नवीन बसस्थानक उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्या नुसार हे काम सुरु झाले होते. या बसस्थानकासाठी तब्बल 50 कोटी रुपयांचा खर्च येणार असून अतिशय सुसज्ज असे बसस्थानक बारामतीच्या वैभवात भर घालणारे ठरणार आहे.

आर्किटेक्ट सुनील पाटील यांनी या बसस्थानकाचा आराखडा तयार केलेला असून नाशिक येथील हर्ष कन्स्ट्रक्शन्स या बसस्थानकाची उभारणी करीत आहे. या बसस्थानकावर एकाच वेळेस 22 बसेस फलाटावर उभ्या राहू शकणार आहेत.

हे बसस्थानक उभारताना आगामी काही वर्षांचा विचार करुन ही वास्तू उभारण्यात आली आहे. यात प्रवाशांचा सर्वाधिक विचार करण्यात आला आहे. व्यावसायिक स्तरावर उत्पन्नाचे साधन मिळवून देण्यासह अनेकांना येथे आपले व्यवसाय नव्याने सुरु करण्याची संधी मिळणार आहे.

आर्किटेक्ट सुनील पाटील यांनी सांगितले की, येथे प्रकाशयोजना चांगली असल्याने वीजेची बचत होणार आहे. इमारतीत ओपन टू स्काय गार्डन असेल. उत्तम कँटीन होणार असून लोकांना निवांतपणे बसता येईल. बसस्थानकाला झिंक रुफिंग असून पन्नास वर्षांची त्याची गॅरंटी आहे. देखभाल दुरुस्ती कमी लागावी अशा रितीने रचना केली आहे. एकाच वेळेस 80 बसेस रात्रीच्या वेळेस उभ्या राहू शकतील. नव्या रचनेत इलेक्ट्रीक गाड्या असतील ही बाब विचारात घेऊन त्याचीही तरतूद होणार आहे.

उन्हाळा सुरु होण्यापूर्वी बसस्थानक सुरु व्हावे...

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर बारामतीचे बसस्थानक वेगाने पूर्ण करुन नव्या बसस्थानकावरुन बसेसची वाहतूक व्हावी अशी बारामतीकरांची इच्छा आहे. सध्याच्या तात्पुरत्या बसस्थानकात प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. उन्हाळ्यात लोकांची यात गैरसोय होणार असल्याने नवीन बसस्थानक लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

यांचा आहे यात समावेश

• आरक्षण केंद्रासाठी स्वतंत्र जागा

• व्हीआयपी वेटींग रुम

• हिरकणी कक्ष

• पोलिस मदत केंद्रासाठी जागा

• वाहतूक नियंत्रक कक्ष

• लेखा शाखेसाठी स्वतंत्र व्यवस्था

• महिला विश्रांती कक्ष

• उपहारगृहासाठी सुविधा

• विविध वस्तूंची 30 दुकाने

• विविध उपक्रमांसाठी सभागृहाची इमारत

• राज्य परिवहन बँकेसाठी जागा

• विश्रांती कक्ष व स्वच्छतागृहांची चालक वाहकांसाठी सोय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah Rukh Khan: सलमाननंतर आता शाहरुख खानला धमकीचा फोन; जीवे मारण्याची धमकी, पोलिसांनी ट्रेस केला कॉल

'लोकसभेत आमचा पराभव झाला असला, तरी विधानसभेत महायुतीचे 180 आमदार निवडून येणार'; रावसाहेब दानवेंना विश्वास

Ajit Pawar: पवारांवर बोलताना सदाभाऊंची जीभ घसरली, अजित पवार भडकले; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया...

PM Internship Scheme साठी नोंदणीची अंतिम तारीख जवळ, लवकरच अर्ज करा, जाणून घ्या कसा?

Latest Maharashtra News Updates : अभिनेता शाहरुख खानला धमकी

SCROLL FOR NEXT