बारामती : कोरोनाच्या संकटाने (Corona Pandemic) महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (Maharashtra State Road Transport Corporation) बारामती आगाराचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. कोरोनाने बारामतीची लाल परी ठप्प असून दररोज किमान पंधरा लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. एसटीच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात गतवर्षीही लॉकडाऊनचा (Lockdown) फटका बसला, यंदाही आता दोन महिने एसटीची सेवाच ठप्प असल्याने कमालीचे आर्थिक नुकसान एसटीला सहन करावे लागले आहे. गतवर्षी या तीन महिन्यात एसटीच्या बारामती (Baramati ST bus depot) आगाराला 15 कोटींच्या नुकसानीचा फटका सहन करावा लागला. यंदाही किमान 15 कोटींचे नुकसान सहन करावे लागेल, अशीच स्थिती आहे.
बारामती आगाराच्या दररोजच्या 450 फे-या होतात, सध्या एकही फेरी होत नाही. आगाराकडे 95 गाड्या असून दररोज किमान 36 हजार कि.मी. प्रवास या गाड्या करतात. फक्त बारामती पुणे बारामती मार्गावरच दररोजच्या सगळ्या मिळून 100 फे-या होतात, किमान पाच हजार प्रवासी यात प्रवास करत असतात. बारामती आगाराकडे 188 चालक, 165 वाहक व इतर 90 कर्मचारी आहेत. यांचा महिन्याचा पगारच जवळपास सव्वा कोटी रुपयांच्या घरात आहे. बारामती आगाराला दररोज किमान आठ हजार लिटर डिझेल लागते. सध्या डिझेलचा खर्च फक्त वाचत आहे, पण दुसरीकडे उत्पन्नही शून्यावर आले आहे. शाळा बंद असल्याने त्याचाही एसटीवर विपरीत परिणाम झाला आहे.
नुकसान कसे भरुन काढणार....
एकट्या बारामती आगाराचे तीन महिन्यांचेच नुकसान किमान 15 कोटींच्या घरात असेल तर इतके मोठे नुकसान कसे भरुन काढले जाणार ही चिंता सगळ्यांनाच सतावते आहे. कोरोनाच्या भीतीने प्रवासी संख्याही रोडावल्याने भविष्यात पुन्हा पूर्वपदावर ही सेवा कधी येणार याची चिंता सगळ्यांनाच लागून राहिली आहे.
Baramati ST bus depot loss 15 crore in 3 months covid 19 lockdown
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.