बारामती - शहरातील वाहतूकीला शिस्त लावण्याच्या दृष्टीने वाहतूक आराखड्यातील काही बाबींची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचा निर्णय झाला आहे. पोलिस, उपप्रादेशिक परिवहन विभाग व व्यापारी प्रतिनिधींच्या बैठकीत या बाबत एकमताने काही बाबी निश्चित करण्यात आल्या.
गुरुवारी (ता. 11) अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या बैठकीस अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी, सुशील सोमाणी,
जगदीश पंजाबी, स्वप्निल मुथा, महेश ओसवाल, सचिन बुधकर, नीलेश कोठारी, संतोष टाटीया, बारामती चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रमोद काकडे, दत्ता कुंभार यांच्यासह इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अनंत अवचट, पियाजिओ व्हेईकल्सचे चंद्रकांत काळे, भारत फोर्जचे सदाशिव पाटील, किर्लोस्कर स्टीलचे विशाल पाटील, विशाल जाधव आदी उपस्थित होते.
बारामतीतल प्रमुख चौकातील सिग्नल्स सकाळी आठ ते दुपारी एक पर्यंत व संध्याकाळी चार ते रात्री आठ पर्यंत सुरु ठेवण्याचे निश्चित करण्यात आले. गांधी चौकात ट्रॅफिक पोलिस व वॉर्डन यांच्या मदतीने महावीर पथ व स्टेशन रस्त्याकडे तीन व चार चाकी वाहने जाऊ देऊ नयेत.
या शिवाय गांधी चौक- भिगवण चौक- इंदापूर चौक- गुनवडी चौक ते पुन्ह गांधी चौक या चार वर्दळीच्या चौकादरम्यानच्या रस्त्यांवर तीन किंवा चार चाकी वाहनांचे पार्किंग होऊ देऊ नये. माल वाहतूक किंवा ग्राहकांना दुकानापर्यंत सोडण्यासाठी वाहने येऊ शकतील मात्र रस्त्यावर वाहन थांबून राहणार नाही, असेही निश्चित केले गेले.
दरम्यान शहरातील सर्वच प्रमुख चौकांमध्ये गर्दीच्या वेळेस वाहतूक पोलिसांची उपस्थिती असेल, ज्या वेळेस पोलिस उपस्थित नसतील तेव्हा व्यापारी वर्गांनी वरिष्ठांच्या ही बाब निदर्शनास आणून द्यावी, असेही आनंद भोईटे यांनी सांगितले.
दरम्यान समविषम तारखांना रस्त्याच्या बाजूला पार्किंग करण्यास व्यापा-यांनी विरोध केला. वाहनांची संख्या विचारात घेता एका बाजूला पार्किंग शक्य नसल्याने रस्त्याच्या पांढ-या पट्ट्यांच्या आतच दुचाकी वाहने पार्क करावीत, पट्ट्याच्या बाहेर पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई केली जाणार आहे.
ई व्हेईकलची संकल्पना...
दरम्यान बारामती शहरात नागरिकांना दुकानापर्यंत सोडविण्यासाठी ई व्हेईकल्स व्यापा-यांनी उपलब्ध करुन दिल्यास लोकांना पार्किंगपासून बाजारपेठेत जाणे सोपे होईल, लोकसहभागातून अशी वाहने उपलब्ध करुन द्यावीत असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले.
शौचालय उपलब्ध करुन देण्याचीही तयारी...
नगरपालिकेच्या वतीने बाजारपेठेत जागा दिल्यास दहा नवीन पध्दतीची शौचालय उपलब्ध करुन देण्याचीही तयारी मुख्याधिका-यांनी दाखविली. महिलांना याचा अधिक फायदा होऊ शकेल. या बाबत व्यापारी चर्चा करुन नगरपालिकेस सांगणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.