सिग्नेटमधील मुलांनी निर्मल फाउंडेशनच्या वृद्धाश्रमातील आजी-आजोबांशी संवाद sakal
पुणे

गुणवंत, ज्ञानवंत आणि खूप मोठे व्हा, आई-वडिलांना विसरू नका

सिग्नेटमधील मुलांनी निर्मल फाउंडेशनच्या वृद्धाश्रमातील आजी-आजोबांशी संवाद

सकाळ वृत्तसेवा

उंड्री : मुलांनो तुम्ही गुणवंत व्हा, ज्ञानवंत व्हा, खूप मोठे अधिकारी बना. मात्र, आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना विसरू नका, असा मोलाचा सल्ला वृद्धाश्रमातील आजी-आजोबांनी मुलांना दिल्याचे सिग्नेट पब्लिक स्कूलच्या प्राचार्य कल्पना निलाखे यांनी सांगितले.

हांडेवाडी रोड येथील 'निर्मल फाउंडेशन' वृद्धाश्रमाला जेएसपीएमचे सिग्नेट पब्लिक स्कूलमधील नववीतील विद्यार्थ्यांनी भेट दिली. यावेळी निर्मल फाउंडेशन वृद्धाश्रमच्या संचालिका निर्मला झेंडे यांनी वृद्धाश्रमातील आजी-आजोबांची भेट घडविली. मुलांनी त्यांच्याशी संवाद साधला. नातवंडे भेटल्याच्या आनंदाने आजी आजोबांच्या चेहऱ्यावरून आनंदाश्रू वाहू लागले. उतारवयात प्रेम, माया आणि आपुलकी हवी असते.

मुलांचे लाड पुरवण्याची हौस असते, ती त्यांना आज गोड बोलत पुरवता आल्याचे आजी-आजोबांनी सांगितले. मोठ्या माणसांचा आदर करा, आई-वडिल देवासमान आहेत, हे विसरू नका असेही त्यांनी मुलांना समजावून सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांना जीवनावश्यक वस्तूंची भेट दिली.

हांडेवाडीतील जेएसपीएम संकुलाचे संचालक डॉ. संजय सावंत, प्राचार्या कल्पना निलाखे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्या काकोली महातो, मुख्याध्यापक दिपाली शितोळे, पर्यवेक्षक संगीता पाटील व रमा कापडी यांनी आश्रमातील भेटीचे नियोजन केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT