fire sakal
पुणे

उन्हाळ्यातील आगीपासून सावधान!

मागील आठवड्यामध्ये पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागात एकाच दिवशी आगीच्या चार घटना घडल्या होत्या. त्यामध्ये दोन गादीच्या कारखान्यांना आग लागली होती.

पांडुरंग सरोदे@spandurangSakal

मागील आठवड्यामध्ये पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागात एकाच दिवशी आगीच्या चार घटना घडल्या होत्या. त्यामध्ये दोन गादीच्या कारखान्यांना आग लागली होती.

पुणे - पावसाळा, हिवाळा या दोन्ही ऋतुंमध्ये आगीच्या (Fine) घटना घडण्याचे प्रमाण तुलनेने कमी असते, मात्र उन्हाळ्यात (Summer) उष्णतेच्या (Heat) प्रमाणात वाढ होत असल्याने अन्य ऋतुंच्या तुलनेत उन्हाळ्यात आग लागण्याच्या घटनांमध्ये ५० टक्‍क्‍यांहून अधिक वाढ होते. मागील वर्षी आगीच्या १६४१ घटना घडल्या असून त्यामध्ये आग, शॉर्टसर्किट व कचऱ्याला लागणाऱ्या आगीच्या घटना सर्वाधिक आहेत. त्यामुळे आगीच्या घटना टाळण्यासाठी, कुटुंबासह इतरांच्याही जीविताला धोका पोचू नये, यासाठी उन्हाळ्यामध्ये नागरिकांना दक्ष राहावे लागणार आहे.

मागील आठवड्यामध्ये पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागात एकाच दिवशी आगीच्या चार घटना घडल्या होत्या. त्यामध्ये दोन गादीच्या कारखान्यांना आग लागली होती. सध्या उन्हाळा होत असून या स्वरूपाच्या आगीच्या घटनांमध्येही आता हळूहळू वाढ होण्याची शक्‍यता आहे. मागील पाच वर्षामध्ये सर्वसाधारण आगीच्या घटनांची संख्या सर्वाधिक आहे. २०२० ते २०२१ या कालावधीमध्ये कोरोनामुळे नागरिक घरी असल्याने आगीच्या घटना घडण्याचे प्रमाण कमी झाले. परंतु, यावर्षी उन्हाचा चटका आता वाढू लागल्याने आगीच्या घटनाही वाढण्याची शक्‍यता नाकारता येणार नसल्याचे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हिवाळा व पावसाळ्यामध्ये दरदिवसाला आगीच्या किमान ५ ते ६ घटनांची अग्निशामक दलाकडे नोंद होते. तर उन्हाळ्यातील एप्रिल, मे महिन्यात दरदिवशी किमान १५ ते २० आगीच्या घटना घडता. इतर ऋतुंपेक्षा उन्हाळ्यामध्ये तापमान वाढ जास्त होते. परिणामी गवत, कागद, प्लॅस्टिक, गॅस गळती किंवा अशा वस्तु पेटण्यासाठी आवश्‍यक तापमान त्यांना मिळते. शॉर्टसर्किट, ओव्हर हिटींगमुळेही आगीच्या घटना वाढतात. विशेषतः झोपडपट्ट्यांसारखी दाट लोकवस्ती, घरे, बंगले, सोसायट्या, दुकाने, गोदामे, फॅब्रिकेशनची दुकाने, कारखाने, कंपन्या व कचराडेपो येथे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होते.

उन्हाळ्यामध्ये आगींच्या घटनांमध्ये ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त वाढ होते. बहुतांश आगीच्या घटना टाळता येऊ शकतात. त्यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यायला पाहिजे.

- सुनील गिलबिले, मुख्य अग्निशामक अधिकारी, महापालिका अग्निशामक दल

अशा करा उपाययोजना

  • अग्निशामन उपकरणे बसवून त्याचा वापर करण्यास प्राधान्य देणे

  • घरातील गॅसचे बटण, सिलेंडरचा नॉब बंद करणे

  • विजेची बटणे बंद करण्याबरोबरच एका वीजजोडमधून जादा वापर टाळणे

  • जुन्या वस्तू, कपडे व टाकाऊ वस्तू घरात न ठेवणे

  • गॅस गळती होऊ नये, याची खबरदारी घेणे

  • शॉर्टसर्किट होऊ नये, यादृष्टीने उपाययोजना करणे

  • निवासी सोसायट्यांमध्ये ज्वलनशील पदार्थ, वस्तू ठेवण्यास मनाई करणे

आगीच्या घटना कशामुळे घडतात ?

उन्हाळ्यामध्ये तापमानात वाढ झालेली असते. त्यामुळे घरांवरील पत्रे, सार्वजनिक कचराकुंडी, त्यामधील कागद, प्लॅस्टिकच्या वस्तू, टेकड्यांवरील गवत गरम झालेले असते. आग लागण्यासाठी आवश्‍यक तापमान त्यांना वाढत्या उन्हामुळे मिळते. त्यानंतर आगीच्या घटना घडतात. शॉर्टसर्किट तसेच ओव्हर हिटींगमुळेही आगीच्या घटना घडतात. अनेकदा एकाच प्लगमधून पंखा, मिक्‍सर, टिव्ही, फ्रिज अशा अनेक वस्तूंचा वापर केला जातो. त्यामुळेही आग लागते. उन्हामुळे भिंती, स्लॅबचे तापमान वाढते, त्यातच किचनमध्ये सातत्याने गॅस सुरू असल्यामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेचा परिणाम गॅस सिलिंडरवर होऊन आगीच्या घटना घडतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT