ramesh bais sakal
पुणे

Ramesh Bais : 'युवकांनी आता देशासाठी संपत्तीचे निर्माते बनावे'

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचा पंचविसावा पदवी प्रदान समारंभ संपन्न उत्साहात

सकाळ वृत्तसेवा

कात्रज - भारताकडी युवाशक्ती हे देशाचे बलस्थान आहे. त्यामुळेच अवघ्या जगाचे लक्ष भारताकडे लागलेले आहे. आपण सारे काही करू शकतो या भूमिकेतून आपल्या तरुणांनी आता संपत्तीचे निर्माते बनण्याची गरज असल्याचे असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या २५ व्या पदवी प्रदान समारंभाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास कुलगुरू डॉ. विवेक सावजी, प्र-कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम, परीक्षा विभागाचे नियंत्रक डॉ. अँथनी रोज, कुलसचिव जी. जयकुमार यांच्यासह सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता आणि व्यवस्थापन मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

या पदवी प्रदान समारंभात ५८५८ स्नातकांना पदवी आणि ५६ विद्यार्थ्यांना पीएचडी प्रदान करण्यात आली. प्रत्येक विद्याशाखांमध्ये पदव्युत्तर आणि पदवी परीक्षांमध्ये सर्वोच्च गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदके आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

बैस म्हणाले, 'विकसनशील देशाकडून विकसीत राष्ट्र ही नवी ओळख प्राप्त करण्यासाठी भारतही आता मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. त्या प्रयत्नांमध्ये युवाशक्तीने आपल्या संपूर्ण क्षमतेसह सहभागी व्हावे. आजच्या घडीला जपान, जर्मनी अशा विविध देशांचे प्रतिनिधी जेव्हा मला भेटतात तेव्हा त्या साऱ्यांचीच चिंता एकच आहे ती म्हणजे त्यांच्याकडे युवाशक्तीचे पाठबळ नाही. भारताकडे मात्र युवा शक्ती मोठी आहे. ते लक्षात घेऊन आपल्या उच्च शिक्षित युवा शक्तीने परिवर्तनाच्या यात्रेत सहभागी व्हायला हवे.

आज पुण्यातील विद्यापीठांमध्ये होत असलेल्या समर्पित प्रयत्नांमुळे शहराचा ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट म्हणून गौरव केला जातो. आज मुली शिक्षणात पुढे येत आहेत ही चांगली बाब आहे. मुलांच्या तुलनेत घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून त्या शिक्षण घेतात. असे असताना जेव्हा या मुली टॉपर येऊन सुवर्णपदक मिळवतात तेव्हा त्यांचे विशेष कौतुक करायला हवे, असे म्हणत राज्यपालांनी मुलींचे विशेष कौतुक केले.

यावेळी कुलगुरू डॉ. सावजी म्हणाले, जिद्द आणि महत्वाकांक्षा याच्या बळावर डॉ.पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठाच्या प्रगतीचा आलेख कायम उंचावत ठेवला. विकसित भारताचे व्हीजन भारताचे डाॅक्युमेंटेशन करण्यासाठी देशभरातून ज्या १५३ विद्यापीठांची निवड केली आहे त्यात भारती विद्यापीठाचा समावेश आहे याचा आम्हाला विशेष आनंद आहे.

भारती विद्यापीठाने गावे दत्तक घ्यावीत

भारतात आपल्या आयआयटीचे नवे कँपस उभे राहत आहेत. इतर देशांनाही आपल्याकडील शैक्षणिक ज्ञान हवे असल्याने आपण तिथे आय़आयटी स्थापन करावे म्हणून सामंजस्य करार करण्यास अन्य देश इच्छुक आहेत. आपले देशाप्रती, समाजाप्रती असणारे सामाजिक योगदान लक्षात घेऊन भारती विश्वविद्यालयाने विकास घडवून आणण्यासाठी काही गावे दत्तक घ्यावीत असे आवाहन राज्यपालांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राजकीय पक्ष मेले तरी... निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य, शरद पवारांवरही घणाघात

Latest Maharashtra News Updates : मनसे पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Maratha Reservation: सरकार नालायक, तरुण जीव संपवतायेत; मनोज जरांगेंचा संताप....!

Milind Soman runs barefoot: मिलिंद सोमण नुकतेच धुक्यात अनवाणी पायांनी पळताना दिसले. पण खरंच हे शास्त्रीय दृष्ट्या बरोबर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात.

IPL 2025: मुंबईचा कोच आता RCB मध्ये सामील; 18 व्या हंगामात सांभाळणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT