भोर (पुणे) : प्रशासनाने भोर शहर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले आहे. त्यामुळे रविवारपासून पुढील सात दिवस शहर बंद राहणार आहे. शहरात रविवारपासून (ता.13) शनिवारपर्यंत (ता. 19) केवळ वैद्यकीय सुविधा वगळता इतर सर्व सुविधा बंद राहणार आहेत, अशी माहिती तहसीलदार अजित पाटील यांनी दिली.
भोर शहरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, शुक्रवारी (ता. 11) सकाळपर्यंत शहरातील 39 ठिकाणी मायक्रो कंटेनमेंट झोन बनविण्यात आली आहेत. परंतु, तरीही कोरोनाचा आकडा कमी झालेला नाही. त्यामुळे नगरपालिकेने संपूर्ण शहर प्रतिबंधित क्षेत्र करावे, असा अहवाल तहसीलदारांकडे पाठविला आहे. त्यानुसार रविवारपासून सर्व शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येणार आहे. प्रांताधिकाऱ्यांकडून शनिवारी(ता. 12) याबाबतचे आदेश आल्यानंतर याबाबतची अधिकृत कारवाई सुरु होणार आहे.
दरम्यान, शहरातील वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येमुळे आमदार संग्राम थोपटे यांनी प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार अजित पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार थोरात, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, गटनेते सचिन हर्णसकर आदींसमवेत बैठक घेऊन चर्चा केली. त्यावेळी आमदार थोपटे यांनीदेखील भोर शहर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्याची सूचना प्रशासनास केली होती.
नागरिकांमध्ये अद्यापही संभ्रम
भोर शहरात आठ दिवसांसाठी लॉकडाउन होणार असल्याचे या पूर्वी 2 सप्टेंबरला नगरपालिकेने ऑटो रिक्षामधून दवंडी देऊन जाहीर केले. परंतु, अधिकृत आदेश नसल्यामुळे लॉकडाउन होणार नसल्याचे सांगण्यात आले. या वेळीही प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केल्याचे आदेश अद्याप दिलेले नाहीत. तरीही सोशल मिडीयावर भोर बंदच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. त्यामुळे भोर शहर नक्की बंद राहणार का? याबाबत नागरिकांच्या मनात संभ्रमावस्था आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.