Bhor Nagarpalika sakal
पुणे

Bhor Nagarpalika : भोर नगरपालिकेच्या टॅक्स दरवाढी विरोधात सर्व राजकीय पक्ष एकवटले

भोर नगरपालिका प्रशासनाने चतुर्थ वार्षिक कर आकारणीमध्ये तब्बल २५ टक्के दरवाढ केल्यामुळे कॉग्रेस पक्ष वगळता इतर सर्व राजकीय पक्षांनी निषेध केला.

विजय जाधव

भोर - नगरपालिका प्रशासनाने चतुर्थ वार्षिक कर आकारणीमध्ये तब्बल २५ टक्के दरवाढ केल्यामुळे कॉग्रेस पक्ष वगळता इतर सर्व राजकीय पक्षांनी निषेध केला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी राजकीय पक्षांचा समावेश आहे.

नवीन कर आकारणी न करता जुन्याच दराने कर आकारणी करावी अशा मागणीचे निवेदन राजकीय पक्षांच्या पदाधिका-यांनी याबाबत मुख्याधिकारी तथा प्रशासक हेमंत किरुळकर यांना निवेदन दिले.

नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे, शिवसेना शहर प्रमुख नितीन सोनावले, माजी नगरसेवक केदार देशपांडे, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष पंकज खुर्द, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष शशिकांत वाघ व राजेंद्र शिंदे आदींनी मुख्याधिका-यांना निवेदन दिले आहे. आणि करवाढीसाठी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

नगरपालिकेतील सत्ताधारी असलेल्या कॉग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी २९ जून रोजी करामध्ये सरसकट १० टक्के दरवाढ करण्याचा ठराव पारीत केला आहे. परंतु नगरपालिका प्रशासनाने २५ टक्के सर्वसाधारण कर, १ टक्का वृक्ष कर, १ टक्का अग्निशामक कर, निवासी मालमत्तेसाठी ६ टक्के शिक्षण कर आणि व्यावसायीक मालमत्तेसाठी १२ टक्के शिक्षण कर लादलेला आहे.

याशिवाय दरवर्षी निवासी मालमत्तेसाठी ३६० रुपये आणि व्यावसायीक मालमत्तेसाठी ५४० रुपये करही लादलेला आहे. त्यामुळे प्रत्येक मालमत्तेला सुमारे ३३ ते ३५ टक्के कर नगरपालिकेला द्यावा लागणार आहे.

नगरपालिकेच्या कर आकारणीबाबत माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे यांनी नगरपालिकेविरोधात उपस्थित केलेले प्रश्न पुढीलप्रमाणे

- करवाढीबाबत २९ जूनला नगरपालिकेतील कॉग्रेसच्या जनरल बॉडीने ठराव केला परंतु जाणीवपूर्वक लपवून ठेवला.

- पूर्वीच्या ५ झोनमध्ये वाढ करून ७ झोन केले, त्यामुळे करांमध्ये वाढ झाली.

- कर आकारणीचे सर्वेक्षण करणा-या कंपनीला शासनाने निश्चित केलेला दर प्रतिमिळकत २२३ असूनही कॉग्रेसच्या नगरसेवकांनी दर ५९५ रुपये देण्याचा ठराव केला.

- अनाधिकृत बांधकामांनाही तिप्पट कर न लावता अधिकृत बांधकामांइतकाच कर लावलेला आहे. त्यामुळे अनाधिकृत बांधकांमांकडून कोट्यावधी रुपयांचा कर बुडविण्याचे धोरण घेतले आहे.

तक्रार निवारण कक्ष

नगरपालिकेच्या चतुर्थ कर आकारणीसंदर्भातील तक्रारी व अडचणींचे निवारण करण्यासाठी नगरपालिकेच्या कर विभागात तक्रार निवारण कक्ष तयार करण्यात आला आहे. तेथे नागरिकांना आपल्या करांबाबतची योग्य माहिती दिली जाणार आहे. नागरिकांनी संबंधीत कक्षात आपल्या तक्रारींचे निवारण करावे किंवा आपले आक्षेप नोंदवावेत.

- हेमंत किरुळकर, मुख्याधिकारी भोर नगरपालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लोकसभेचा उत्साह सातव्या आसमानावर; विधानसभेत भ्रमाचा भोपला फुटला, काँग्रेसच्या आत्मविश्वासानं MVAचा खेळ केला?

Abhimanyu Pawar won Aausa Assembly Election : औसा मध्ये फडकला भाजपाचा झेंडा! अभिमन्यू पवारांचा भव्य विजय

Kopri Pachpakhadi Assembly Election 2024 Result: येऊन येऊन येणार कोण! कोपरी पाचपाखाडीत एकनाथ शिंदेंचा एकहाती विजय; केदार दिघेंचा लाजिरवाणा पराभव

Karveer Assembly Election 2024 Results : करवीर मतदारसंघात पुन्हा 'चंद्रदीप'; अतिशय चुरशीच्या लढतीत राहुल पाटलांचा अवघ्या काही मतांनी पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

SCROLL FOR NEXT