बिबवेवाडी - मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बिबवेवाडी परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. स्वामी विवेकानंद मार्गावरील महेश सोसायटी चौकात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
गुरुराज सोसायटीतील रहिवासी भयभीत
अंबिल ओढ्याच्या पात्रात पाण्याची वाढ. अंबिल ओढ्यात येणार्या पाण्याची माहिती मिळत नसल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण.
बिबवेवाडी कोंढवा रस्त्यावर काही ठिकाणी झाडे पडली त्यामुळे वाहतुकीला अडथळा.
विवेकानंद मार्गाला आले नदीचे स्वरुप.
अप्पर येथून येणारी पावसाळी पाण्याची पाईप लाईन जोडलेली नसल्यामुळे चेंबर उघडून रस्त्यावरून पावसाचे पाणी पुन्हा दुसर्या पावसाळी पाईप लाईन मध्ये त्यामुळे रस्त्यावर पाण्याची भर.
महेश सोसायटी चौकात नाल्याच्या अर्धवट कामात पावसाचे पाणी गेले त्यामुळे पुढील पुराचा मोठा धोका टळला.
बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील व सहकार नगर वाहतूक पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव महेश सोसायटी चौकातील वाहतूक वेळेवेळी बदल करत वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत झाली.
पथ विभाग, मलनिस्सारण विभाग व आरोग्य विभागाचे कर्मचारी महेश सोसायटी चौकातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.