Kuldeep Konde sakal
पुणे

Nasrapue News : भोर मध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का! कुलदीप कोंडे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे जिल्हा संघटक कुलदीप कोंडे यांनी आज पुणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

किरण भदे

नसरापूर - लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान गेले काही दिवस नाराज असलेले शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे जिल्हा संघटक कुलदीप कोंडे यांनी आज पुणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशाने महाविकास आघाडीला भोर विधानसभा मतदार संघात मोठा धक्का बसल्याचे मानले जात असुन, शिवसेना उध्दव ठाकरे गटात कोण कोण रहाते हे पाहणे औत्सुक्याचे होणार आहे.

बारामती लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारादरम्यान भोर विधानसभेतील पारंपारीक विरोधक थोपटे व काँग्रेसशी जमवुन घेणे कुलदीप कोंडे व शिवसेना उध्दव ठाकरे गटास अवघड जात होते. प्रचारात देखिल त्यांचा फारसा सहभाग नव्हता. या दरम्यान प्रचारात योग्य सन्मान दिला जात नसल्याची शिवसैनिकांची तक्रार होती.

त्यातच खासदार सुप्रिया सुळे यांनी एका प्रचार सभेत बोलताना विधानसभेचे पुढील उमेदवार म्हणुन आ. संग्राम थोपटे असतील असे वक्तव्य केले होते. यामुळे नाराजी मध्ये भरच पडली होती. या नाराजीचा महायुतीतील नेत्यांनी फायदा घेतल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. गेले काही दिवस कुलदीप कोंडे ठाकरे गट सोडणार अशी चर्चा होती ती आज खरी ठरली. कोणत्या अटी शर्थीवर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला हे अद्याप स्पष्ट नसले तरी यामुळे बारामती लोकसभा मतदार संघात महायुतीची ताकद वाढणार आहे.

पैलवान असलेले कुलदीप कोंडे यांची राजकीय कारकिर्द केळवडे गावच्या उपसरपंच पदापासुन सुरु झाली. सन 2012 मध्ये ते केळवडेचे उपसरपंच असताना त्यांनी राष्ट्रवादी मधुन शिवसेनेत प्रवेश करुन नसरापूर -वेळु गटात जिल्हा परिषद लढवली व विजयी झाले. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्या तिरंगी लढतीत विजयी काँग्रेस नंतर क्रमांक दोनची सुमारे 58 हजार मते त्यांनी घेतली.

त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकात वेळु-भोंगवली गटात महिला जागेवर त्यांची पत्नी शलाका कोंडे यांनी विजय मिळवला. या कालावधीत त्यांनी शिवसेनेची ताकद वाढवण्याचा मोठा प्रयत्न केला. त्याचा फायदा त्यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत झाला.

यावेळी त्यांनी 99 हजार 716 मतदान घेत लाखाच्या जवळपास मजल मारली पराभुत झाले तरी त्यांनी दिलेली लढत व वाढलेली मते यामुळे त्यांचे राजकीय वजन वाढले. निर्व्यसनी, प्रामाणिक कार्यकर्ता म्हणुन त्यांची स्वतःहाची ओळख आहे, बरोबर मोठा युवक वर्ग व भोर वेल्हा मुळशी या कुस्तीप्रिय तालुक्यातील पैलवानांचा मोठा पाठिंबा त्यांना असतो भोर तालुक्यातील महामार्गपट्ट्यात त्यांचे विशेष प्राबल्य आहे.

कोंडे यांच्या प्रवेशानंतर कोण कोण पदाधिकारी त्यांच्या मागे शिंदे गटात जातायत हे अद्याप स्पष्ट नसले तरी मोठ्या संख्यने पदाधिकारी कार्यकर्ते जाण्याची शक्यता आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता भोर तालुक्यातील शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे मी तालुकाप्रमुख व सर्व पदाधिकारी ठाकरे गटात मध्येच असुन आम्ही सर्व उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचे काम करणार आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT