पुणे

Pune Crime News: वनराज आंदेकर खून प्रकरणात मोठी अपडेट! पोलिस तपासामध्ये मध्य प्रदेश कनेक्शन आलं समोर

सकाळ वृत्तसेवा

पुणेः राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून करण्यासाठी हल्लेखोरांना मध्य प्रदेशातून पिस्तुले आणण्यास मदत करणाऱ्याला पोलिसांनी बुधवारी (ता.२५) अटक केली आहे. त्याला मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी एक ऑक्टोबरपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.

अभिषेक ऊर्फ आबा नारायण खोंड (रा. लक्ष्मी गार्डन सोसायटी, शिवणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. खोंड याच्या अटकेनंतर या गुन्‍ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींचा आकडा आता २१ वर गेला आहे. यासह दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत, बंडू ऊर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (वय ६८, रा. नाना पेठ) याने समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

वनराज आंदेकर यांचा खून टोळी वादातून झाला असून त्यासाठी वापरलेली पिस्तुले मध्य प्रदेशातून आणण्यासाठी आरोपी अभिषेक खोंड याने आरोपी आकाश म्हस्के, समीर काळे आणि विवेक कदम यांना मदत केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

खून झाल्यावर अभिषेक खोंड प्रसार झाला होता. या कालावधीत त्याला कोणी आश्रय दिला तसेच आर्थिक मदत केली, त्याने आणखी काही पिस्तुले आणली आहेत का, त्याची कोणाला विक्री केली, या बाबींचा तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील विलास पठारे आणि तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त गणेश इंगळे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Office: फडणवीस यांच्या कार्यालयात अज्ञात महिलेकडून तोडफोड; मंत्रालयात नेमकं काय घडलं?

'बांगलादेशात जे घडतंय, ते आपल्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही'; गोविंद गिरी महाराजांनी हिंदू समाजाला केलं सावध

आयुष्यात 'या' 3 गोष्टी घडत असताना पाळा मौन, अन्यथा मिळतील नकारात्मक परिणाम

Latest Maharashtra News Updates : तेलंगणाच्या मंत्र्याच्या घरी ईडीची धाड

Stock Market: शेअर्स विकण्यासाठी द्यावे लागणार इतके रुपये; CSDLने केला मोठा बदल, 1 ऑक्टोबरपासून होणार लागू

SCROLL FOR NEXT