Narendra Dabholkar Murder Case verdict esakal
पुणे

Narendra Dabholkar Murder Case: नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणी मोठा निकाल ! दोघांना जन्मठेप, तिघांची निर्दोष मुक्तता

अंकिता खाणे (Ankita Khane)

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून करणाऱ्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना येथील विशेष न्यायालयाने जन्मठेप आणि प्रत्येकी पाच लाख रुपयांची शिक्षा सुनावली आहे. तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

विशेष न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल सुनावला. डॉ. तावडे याचा या गुन्ह्यात हेतू दिसून आलेला आहे. तसेच त्यावर संशय घेण्यासारखी परिस्थिती आहे. मात्र त्यांच्या विरोधात गुन्हा सिद्ध करण्यात पोलीस आणि सरकार पक्ष अपयशी ठरले आहेत. तर भावे आणि पुनावळेकर यांच्या विरोधात देखील सक्षम पुरावे सादर करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे या तीनही आरोपींची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे.

सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या विरोधातील सक्षम पुरावे पोलिसांनी न्यायालयात सादर केले. त्या आधारे दोघांना शिक्षा सुनावण्यात येत आहे, असे न्यायाधीश जाधव यांनी निकालात नमूद केले आहे.

हत्येचे समर्थन चुकीचे :

खटल्याची सुनावणी सुरू असताना बचाव पक्षाच्या वकिलांनी अनेक मुद्द्यांवर युक्तिवाद केला. त्यातील एका युक्तीवादात बचाव पक्षाच्या वकिलांनी आरोपींची बाजू मांडत असताना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या गुन्ह्याचे समर्थन केले होते. ही बाब अत्यंत गंभीर असून अशाप्रकारे गुन्ह्याचे समर्थन करणे योग्य नाही. वकिलांनी भविष्यात ही चूक सुधारावी, असे न्यायाधीशांनी निकाल देताना नमूद केले.

तपास अधिकाऱ्यांचा तपासात निष्काळपणा :

आरोपींवर संशय घेण्यास वाव असताना तपास अधिकाऱ्यांनी योग्य प्रकारे तपास न केल्यामुळे तसेच तपासात निष्काळजीपणा दाखवल्यामुळे तीन आरोपीची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. तसेच युएपीएचे कलम सिद्ध होऊ शकले नाही, असे न्यायाधीशांनी निकालात नमूद केले आहे.

आज या प्रकरणाचा निकाल समोर आला आहे. याबाबत बोलताना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा मुलगा हमीद दाभोलकर यांनी बोलताना सांगितले की, न्यायालयाचे निकालाचे आम्ही स्वागत करतो. या प्रकरणात २ जणांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. जे निर्दोष सुटले आहेत त्यांच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. (Big verdict in Dabholkar murder case Three acquitted Two convicted)

नरेंद्र दाभोलकर हत्या घटनाक्रम

२० ऑगस्ट २०१३ - डॉ. नरेन्द्र दाभोलकर यांची शिंदे पुलावर हत्या

३० ऑगस्ट २०१३- सुमारे आठ कोटी फोन कॉल्स व ई मेल्सची तपासणी

२ सप्टेंबर २०१३ - रेखाचित्र तयार व १७ संशयित ताब्यात

१९ डिसेंबर २०१३ - गुन्ह्यात शस्त्रे पुरवल्याबद्दल ठाण्याच्या मनीष नागोरी व विकास खंडेलवाल याना अटक

१३ मार्च २०१३ - नागोरी व खंडेलवाल यांची ओळखपरेड

९ मे २०१४ - केंद्रीय गुप्तचर विभागाकडे (सीबीआय ) तपास वर्ग

३१ डिसेंबर २०१६ - सनातन प्रभातच्या डॉ. वीरेंद्र तावडेच्या व पुण्याच्या सारंग अकोलकरच्या घरावर छापे

११ जून २०१६ - डॉ. वीरेंद्र तावडे याला अटक

१४ जून २०१६ - या गुन्ह्याचा सूत्रधार तावडे असल्याचा 'सीबीआय' चा न्यायालयात दावा

३० नोव्हेंबर २०१६ - वीरेंद्र तावडेंविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

२१ मे २०१८ - पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुनाप्रकरणी कर्नाटक पोलिसांकडून अमोल काळेला अटक

६ जुलै २०१८- न्यायालयाने तावडेचा जमीन फेटाळला

१० ऑगस्ट २०१८ - दहशतवाद प्रतिबंधक विभागाकडून (एटीएस) मुंबईतून सुधन्वा गोंधळेकर, वैभव राऊत, शरद काळे यांना अटक

१८ ऑगस्ट १८ - 'एटीएस' ने सोडून दिलेल्या सचिन अंदुरेला सीबीआयकडून अटक

३१ ऑगस्ट २०१८ - अमित दिगवेकर व राजेश बंगेरा यांना सीबीआयकसून अटक

४ आकटोबर २०१८ - डॉ. दाभोलकर यांच्यावर शरद कळसकर यानेच गोळी झाडल्याचा सीबीआय चा दावा

१५ सप्टेंबर २०१८ - डॉ. तावडे यांच्यासह पाचजणांविरुद्ध न्यायालयात दोषारोप निश्चित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT