sudhir phadke sakal
पुणे

Sudhir Phadke : सुधीर फडके यांच्यावर बायोपिक; गीतरामायणासह विविध गीतांचे उलगडणार पैलू

प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयावर कोरलेलं संगीतविश्वातलं भारदस्त नाव म्हणजे सुधीर फडके. आता त्यांच्या आयुष्यावर लेखक-दिग्दर्शक योगेश देशपांडे हे चरित्रपट (बायोपिक) करीत आहेत.

अरुण सुर्वे

प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयावर कोरलेलं संगीतविश्वातलं भारदस्त नाव म्हणजे सुधीर फडके. आता त्यांच्या आयुष्यावर लेखक-दिग्दर्शक योगेश देशपांडे हे चरित्रपट (बायोपिक) करीत आहेत.

पुणे - प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयावर कोरलेलं संगीतविश्वातलं भारदस्त नाव म्हणजे सुधीर फडके. आता त्यांच्या आयुष्यावर लेखक-दिग्दर्शक योगेश देशपांडे हे चरित्रपट (बायोपिक) करीत आहेत. त्यामुळे ‘स्वरगंधर्व सुधीर फडके अर्थात बाबूजी’ यांच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे, तसेच चित्रपटगीतं, भावगीतं, गीतरामायण, देशभक्तीचा जागर करणारे पैलुदार आयुष्य प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

लहानपणापासून सुधीर फडके, त्यांची गाणी, त्यांचं संगीत, कायमचं मनात बसलं आणि आज इतक्या वर्षानंतरही ते अबाधित आहे. म्हणून खरंतर ‘बाबूजी’ या प्रेमळ नावानी सुधीर फडके अगदी जवळचे वाटतात. बाबूजींविषयी मनात असलेले अनेक रंग, पोत आणि स्वभावाचे पैलू अधिक कुतूहल निर्माण करणारे आणि रंजकता वाढवणारे आहेत. त्यांचा अभ्यास करून दर्जेदार, कसदार संहिता करायला सुरुवात केली आणि दिग्दर्शक म्हणून चित्रपटाच्या चित्रीकरणास मार्चमध्ये सुरुवात होणार असल्याचे देशपांडे यांना सांगितले.

बाबूजींना समजून घेताना जेव्हा अनेक लोकांशी बोललो, भेटलो, तेव्हा ते कुठल्याही पुस्तक किंवा छापील माहितीशिवाय भरपूर प्रमाणात सापडत गेले. कालांतराने अभिनेता, निवेदक, लेखक, दिग्दर्शक या माझ्या व्यावसायिक कामाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांच्या सादरीकरणातून बाबूजी आणखी जवळ आले. जाणकार रसिकांना, बाबूजींना प्रत्यक्ष भेटलेल्या व्यक्तींना भेटलो, सगळी गाणी ऐकली, संगीतकार श्रीधर फडके यांच्याकडून बाबूजींचा जीवनप्रवास जाणून अधिक जवळून समजून घेतला आणि एक विलक्षण कुतूहल निर्माण झाल्याचे देशपांडे यांना सांगितले.

आज इतक्या कालखंडानंतरही जाणवते की, बाबूजींचा संगीत क्षेत्रातला ठसा किती मोठा आणि गडद आहे. नव्या पिढीला ती सुमधुर गाणी गावीशी वाटतात, आणि म्हणून नवनवीन गायक कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात, ही खरंतर बाबूजींच्या कारकिर्दीची जादू आहे, हेच निर्विवाद सत्य.

- योगेश देशपांडे, लेखक-दिग्दर्शक

पडद्यामागची कहाणी

या सगळ्याची दुसरी बाजू मला प्रकर्षानं जाणवत राहते, ती म्हणजे सुधीर फडके फक्त त्यांच्या सुमधुर गाण्यांमुळेच प्रेक्षकांच्या लक्षात असतात का? त्यांचं कर्तृत्व, यश, ते कसे मोठे गायक-संगीतकार होते, एवढेच प्रथमदर्शनी रसिकांना माहिती आहे. मात्र ते घडले कसे? लहानपणीचे राम फडके, मोठेपणीचे सुधीर फडके आणि प्रसिद्ध संगीतकार बाबूजी, हा प्रवास नेमका कसा झाला? याची पडद्यामागची कहाणी मिळवायचा प्रयत्न केला आणि त्यामधून तो प्रवास किती खडतर आहे हे उमगले आणि चित्रपटाचे काम सुरू करायचे ठरवले, असे योगेश देशपांडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT