पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई हल्ला झाल्याने शहरातील भाजपचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून या प्रवृत्तीविरुद्ध आणि हल्ल्याच्या सुत्रधारांविरोधात कडक कारवाई करा अशी मागणी करण्यात आली. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा घेऊन अनेक कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, पुणे प्रभारी धीरज घाटे, गणेश बीडकर, हेमंत रासने, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक पोटे, दीपक नागपुरे, दत्ता खाडे, संदीप लोणकर, बापू मानकर यासह आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथील कार्यक्रमात महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरू झाला याचा. याचा निषेध म्हणू चिंचवड येथे शनिवारी एकाने पाटील यांच्या चेहऱ्यावर शाई फेकल्याची धक्कादायक घटना घडली. यानंतर भाजप आक्रमक झाला असून, कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांवर व सुत्रधारावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. विरोधीपक्षांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच महात्मा फुले यांचा विजय असो, बाबसाहेब आंबेडकर यांचा विजय असो या घोषणा देण्यात आल्या, पाटील यांच्या समर्थनार्थही घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करून या आंदोलनाचा समारोप करण्यात आला.
शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, ‘‘विचारांचा सामना विचारांनी करता येत नसल्यामुळे असामाजिक तत्त्वांनी जाणीवपूर्वक आणि इजा पोहोचवण्याच्या उद्देशाने आदरणीय हा शाई हल्ला केला. चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करुणही हा हल्ला करणे संतापजनक आहे. सत्ता गेल्याने विरोधक सैरभैर झाले असून, राज्यातील शांतता बिघडविण्याचा प्रयत्न आहे. कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण करायचा विरोधक सतत प्रयत्न करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.