medha kulkarni sakal
पुणे

Pune News : कोथरूडमधील गटबाजीची भाजप नेत्यांकडून दखल !

पाठोपाठ भाजपच्या आणखी काही कार्यकर्त्यांनी या वादात फेसबुक पोस्टद्वारे उडी घेतली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : चांदणी चौकातील उड्डाण पुलाच्या कार्यक्रमावरून कोथरूड विधानसभा मतदारसंघात सोशल मीडियावर उफाळलेल्या गटबाजीची दखल भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे. या बाबत संबंधितांशी संवाद साधून त्यांना ‘समजावून’ सांगण्याची जबाबदारी शहराध्यांनी पार पाडली आहे.

चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे लोकार्पण केंद्रीय नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी झाले. तत्पूर्वी या कार्यक्रमांच्या नियोजनात तसेच माहिती पत्रकांवर स्थान न मिळाल्याबद्दल आणि पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून डावलले जात असल्याची खंत पक्षाच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष आणि माजी आमदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी फेसबुकवरील एका पोस्टद्वारे व्यक्त केली होती.

कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे अध्यक्ष पुनीत जोशी यांनीही फेसबुक पोस्टद्वारे कुलकर्णी यांचे मुद्दे खोडून काढत शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या २४० होर्डिंग्जवर त्यांचे फोटो होते, असे स्पष्ट केले. तसेच शिस्तीच्या पक्षात श्रेयवादावरून जाहीररित्या नाराजी व्यक्त केल्याबद्दल भाजप कार्यकर्ते नाराज झाल्याचे त्यांनी म्हटले होते. पाठोपाठ भाजपच्या आणखी काही कार्यकर्त्यांनी या वादात फेसबुक पोस्टद्वारे उडी घेतली.

या पार्श्वभूमीवर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, ‘‘चांदणी चौकातील कार्यक्रमावरून कुलकर्णी आणि जोशी यांनी सोशल मीडियावर केलेली वक्तव्ये पक्षासाठी बरोबर नाहीत. त्याची दखल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे. तसेच दोन्ही घटकांशी चर्चा करण्यास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी सांगितले आहे. त्यानुसार त्यांच्याशी चर्चा केली आहे.’’ या पुढे असे प्रकार होऊ नयेत, यासाठीही उपाययोजना सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी कायम राहणार का? जाणून घ्या आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Jammu Kashmir : ...तर काश्मीरमध्ये वेगळी स्थिती असती; उमर अब्दुल्लांकडून वाजपेयींची तोंडभरून कौतुक, नेमकं काय म्हणाले?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

SCROLL FOR NEXT