Murlidhar Mohol  sakal
पुणे

Murlidhar Mohol : भाजपची हॅटट्रिक; पण सावधानतेचा इशारा

राज्यभरात भाजपला जबरदस्त झटका बसलेला असताना, पुण्यात मात्र सुमारे सव्वा लाख मतांनी मुरलीधर मोहोळ यांना विजय मिळाल्याने कार्यकर्त्यांना सुखद धक्का बसला.

ब्रिजमोहन पाटील - सकाळ वृत्तसेवा

राज्यभरात भाजपला जबरदस्त झटका बसलेला असताना, पुण्यात मात्र सुमारे सव्वा लाख मतांनी मुरलीधर मोहोळ यांना विजय मिळाल्याने कार्यकर्त्यांना सुखद धक्का बसला. सलग तीन लोकसभा निवडणूक जिंकत भाजपने लोकसभेच्या इतिहासात प्रथमच हॅटट्रिक केली आहे. या जमेच्या बाजू असल्या; तरी २०१९च्या तुलनेत यंदा मताधिक्य तब्बल दोन लाखांनी घटल्याने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी धोक्याचा इशारा दिला आहे.

पुणे काँग्रेसचा परंपरागत हक्काचा मतदारसंघ असला; तरी गेल्या काही वर्षांत काँग्रेसची स्थिती फारशी चांगली नाही. पुणे विस्तारत असताना काँग्रेस मात्र ठराविक पॉकेटपुरताच मर्यादित राहिला आहे. त्या तुलनेत भाजपने मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये हातपाय पसरले आहेत. लवकरच महापालिका निवडणूक होणार असल्याने भाजपने संपूर्ण शहरातील बूथ यंत्रणा मजबूत करण्यावर भर दिला. त्यामुळे प्रत्येक भागात पक्षाचा कार्यकर्ता असल्याने त्या भरवशावर आम्ही निवडणुका जिंकू असा भाजपकडून विश्‍वास व्यक्त केला जात होता. या बूथ यंत्रणेची चाचपणी २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने झाली आहे.

लोकसभेच्या प्रचारादरम्यान भाजपला एकसंधपणे पक्षाचा प्रचार करता आलेला नव्हता. १०० माजी नगरसेवक असूनही त्यातील अनेकजणांनी प्रचार केवळ सोशल मीडियावर फोटो टाकण्यापुरताच केला होता. पुणे लोकसभेची जागा भाजपची ‘ए प्लस’ची असून माजी नगरसेवक, महत्त्वाचे पदाधिकारी पूर्ण शक्तीनिशी प्रचार करत नव्हते. त्यामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी नगरसेवकांची बैठक घेऊन प्रचार करा अन्यथा परिणाम भोगा, असा थेट इशारा दिली होता. मोहोळ यांचा सव्वा लाखाने विजय झालेला असला; तरी मतदारांनी केंद्रात भाजप आणि एनडीएची सत्ता आली पाहिजे, या विचाराने मतदान केलेले आहे. त्यामुळे या मताधिक्याचा फायदा आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीला होईलच अशी स्थिती नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT