bopdev ghat rape case accused sakal
पुणे

Pune Crime : बोपदेव घाट तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस जाहीर

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बोपदेव घाटात तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाख रुपयांचे बक्षीस पुणे पोलिसांनी जाहीर केले आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे.

पोलिसांनी आत्तापर्यंत बोपदेव घाट परिसरात गेलेल्या तीन हजार मोबाइलधारकांची माहिती संकलित केली असून, सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात येत आहे. तसेच, दोनशेहून अधिक संशयितांची चौकशी केल्याची माहिती पोलिस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.

बोपदेव घाट परिसरात गुरुवारी (ता. ३) रात्री तरुणी मित्रासमवेत फिरण्यास गेली होती. त्यावेळी तीन आरोपींनी तरुणीसह तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवत बांबूने मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी तरुणाला शर्ट आणि बेल्टने बांधून तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेसह तपास पथकांकडून आरोपींचा माग घेण्यात आहे.

दरम्यान, ‘आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. या घटनेच्या कालावधीत बोपदेव घाटमार्गे प्रवास केलेल्या तीन हजार मोबाइलधारकांची माहिती आणि सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी संकलित केली आहे. या सर्व माहितीद्वारे ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे.

तसेच, दोनशेहून अधिक संशयितांची चौकशी करण्यात आली आहे. तसेच, पुण्यासह सोलापूर आणि इतर जिल्ह्यातही आरोपींचा कसून शोध घेण्यात येत आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल,’ असे पोलिस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी सांगितले.

श्वान पथकाची मदत -

आरोपींचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाची मदत घेण्यात येत आहे. पोलिसांच्या श्वान पथकाने नेमक्या घटनास्थळाचा शोध घेतला. त्याठिकाणी आरोपींनी मारहाण करण्यासाठी वापरलेला बांबू आणि रक्त आढळून आले. ‘पोलिसांनी रक्ताचे नमुने आणि इतर साहित्य जप्त करण्यात केले आहे. ते नमुने तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे,’ अशी माहिती पोलिस सह आयुक्त शर्मा यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs BAN, 1st T20I: हार्दिक पांड्या अन् नितीश रेड्डीने केलं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब, मालिकेतही आघाडी

Palghar News: पालघरच्या किनारपट्टीवर संशयास्पद बोट दिसली, तटरक्षक दलाकडून शोध मोहीम सुरू

Viral Video : 'बुगडी माझी सांडली गं'वर सत्तरी ओलांडलेल्या आजींचा डान्स; नेटकरी म्हणाले, "एक लाख गौतमी पाटील..."

रिऍलिटी शो आहे की सिंपथी... मिताली मयेकरच्या त्या प्रश्नाचा रोख सुरज चव्हाणकडे? नेमकं काय म्हणाली?

Suraj Chavan Winning Amount: सुरज ठरला 'BB Marathi 5'चा विजेता; बक्षीस म्हणून मिळाली 'इतकी' रक्कम; आणखी काय काय मिळणार?

SCROLL FOR NEXT