sakal
पुणे

Bopdev Ghat Rape Case : बोपदेव घाट आत्याचार प्रकरणातील नराधम अद्यापही फरार; पोलिसांकडून २०० संशयितांची कसून चौकशी

रोहित कणसे

पुणे, ता. ६ : बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी तीन हजार मोबाइलधारकांची माहिती संकलित केली असून, परिसरातील सीसीटीव्हीतील चित्रीकरण तपासण्यात येत आहे. या माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करण्यात येत असून, दोनशेहून अधिक संशयितांची चौकशी करण्यात येत आहे.

बोपदेव घाट परिसरात गुरुवारी (ता. ३) रात्री तरुणी मित्रासमवेत फिरण्यास गेली होती. त्यावेळी तीन आरोपींनी तरुणीसह तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवत बांबूने मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी तरुणाला शर्ट आणि बेल्टने बांधून तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेसह तपास पथकांकडून आरोपींचा माग घेण्यात आहे. या घटनेच्या कालावधीत बोपदेव घाटमार्गे प्रवास केलेल्या तीन हजार मोबाइलधारकांची माहिती पोलिसांनी संकलित केली आहे. या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण सुरू आहे. तसेच, दोनशेहून अधिक संशयितांची चौकशी करण्यात येत असल्याची पोलिसांकडून देण्यात दिली.

श्वान पथकाची मदत -

आरोपींचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाची मदत घेण्यात येत आहे. पोलिसांच्या श्वान पथकाने घटनास्थळाचा शोध घेतला. त्याठिकाणी आरोपींनी तरुणाला मारहाण करण्यासाठी वापरलेला बांबू आणि रक्त आढळून आले. पोलिसांनी बांबू आणि रक्ताचे नमुने जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs BAN, 1st T20I: हार्दिक पांड्या अन् नितीश रेड्डीने केलं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब, मालिकेतही आघाडी

Palghar News: पालघरच्या किनारपट्टीवर संशयास्पद बोट दिसली, तटरक्षक दलाकडून शोध मोहीम सुरू

Viral Video : 'बुगडी माझी सांडली गं'वर सत्तरी ओलांडलेल्या आजींचा डान्स; नेटकरी म्हणाले, "एक लाख गौतमी पाटील..."

रिऍलिटी शो आहे की सिंपथी... मिताली मयेकरच्या त्या प्रश्नाचा रोख सुरज चव्हाणकडे? नेमकं काय म्हणाली?

Pune Crime : बोपदेव घाट तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस जाहीर

SCROLL FOR NEXT