पुणे : खोपोलीजवळ बोरघाटात झालेल्या दुर्घटनेतील अपघातग्रस्त बस ' प्रवेश निषिद्ध' क्षेत्रातून, म्हणजेच उलट चुकीच्या दिशेने रिलीफ लेनमध्ये आली. हा जीवघेणा अपघात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे झाल्याचे स्पष्टीकरण आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि. च्या वतीने करण्यात आले आहे.
खोपोलीजवळ बोरघाटात खासगी बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी आम आदमी पक्षाने केली होती. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या म्हणण्यानुसार, प्रवाशांची सुरक्षितता हेच कंपनीचे सर्वोच्च उद्दिष्ट असून, कंपनीतर्फे या संदर्भातील सर्व आवश्यक कार्यवाही कराराच्या अधीन राहून प्राधान्याने केली आहे.
योग्य दिशेने येणाऱ्या वाहनांच्या चालकांच्या माहितीसाठी अपघाताच्या ठिकाणी आधीपासूनच वेग- मर्यादा निर्देशक, ब्लिंकर्स, कॅट-आईज, दुचाकी प्रवेश फलक, रंबलर स्ट्रीप बोर्ड, रंबलर स्ट्रिप मार्किंग, अपघातप्रवण क्षेत्र फलक, रिस्ट्रिक्शन एंड फलक आणि स्टीप ग्रेडियंट फलक यासारख्या सुरक्षा उपायांचे यापूर्वीच पालन केलेले आहे. निर्देशानुसार कंपनीने क्रॅश बॅरीयर्स उभारलेले आहेत.
महत्वाची बाब म्हणजे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाट हा भौगोलिकदृष्ट्या कोणत्याही अभियांत्रिकी वा स्थापत्य कामांसाठी अत्यंत अवघड आहे. परिणामी, अशा ठिकाणी उपलब्ध सुरक्षितता उपाययोजनांसोबतच वाहतूक नियमांच्या कठोर अंमलबजावणीची नितांत आवश्यकता आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.