bottles of medicines thrown into water of Khadakwasla dam are empty Irrigation department officials to hide truth sakal
पुणे

Pune : खडकवासला धरणाच्या पाण्यात फेकण्यात आलेल्या औषधांच्या बाटल्या रिकाम्या?

पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून फिर्यादीत वास्तव लपविण्याचा प्रयत्न;तपास अधिकाऱ्यांचेही मौन

निलेश बोरुडे

सिंहगड: खडकवासला धरणाच्या पाण्यात अज्ञाताने रिकाम्या बाटल्या फेकल्याची फिर्याद पाटबंधारे विभागाच्या खडकवासला धरण शाखा अभियंता गिरिजा फुटाणे यांनी हवेली पोलीस ठाण्यात दाखल केली असून उशिरा दाखल करण्यात आलेल्या या तक्रारीत वास्तव लपविण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येत आहे.

प्रत्यक्षात अनेक औषधांच्या बाटल्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात औषध होते तर काही बाटल्या पूर्ण भरलेल्या होत्या. याबाबत तपास करणारे हवेली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनीही मौन बाळगल्याने या प्रकरणाचे गूढ अधिक वाढले आहे.

18 ऑक्टोबर रोजी खडकवासला धरण चौपाटीजवळ तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना खडकवासला धरणाच्या पाण्यात व पाण्याजवळ मोठ्या प्रमाणात औषधांच्या बाटल्या फेकण्यात आल्याचे दिसून आले. सुरक्षारक्षकांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी हवेली पोलीस ठाण्याला माहिती दिली.

माहिती मिळताच पोलीस व पाटबंधारे विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पाटबंधारे विभागाचे कर्मचारी व सुरक्षारक्षकांनी धरणाच्या पाण्यात पडलेल्या सुमारे गोणीभर औषधांच्या बाटल्या बाहेर काढल्या. बाटल्या फुटलेल्या असल्याने घटनास्थळी औषधाचा उग्र दर्प पसरला होता. तसेच तीन ते चार बॉक्स औषधांच्या बाटल्या पाण्याच्या कडेला पडलेल्या होत्या.

यामधील काही बाटल्यांमध्ये औषध असल्याचे स्पष्ट दिसून येत होते. असे असताना शाखा अभियंत्यांनी दिलेल्या तक्रारीत मात्र औषधांच्या सर्व बाटल्या रिकाम्या असल्याचे नमूद करण्यात आले असून याबाबत विचारणा केली असता तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांनीही उत्तर दिले नाही.

नष्ट करण्याची घाई,तक्रारीस मात्र विलंब औषधांच्या बाटल्या आढळल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने औषधे नष्ट करणाऱ्या एजन्सीची माहिती काढली. संबंधित एजन्सीला पाचारण करून औषधांच्या सर्व बाटल्या त्यांच्याकडे देण्यात आल्या.

दुसऱ्या बाजूला चोवीस तास उलटून गेले तरी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नव्हती. अखेरीस 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास अज्ञात इसमाच्या विरोधात औषधांच्या रिकाम्या बाटल्या फेकल्याची तक्रार दाखल करण्यात आली.

लाखो पुणेकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही गंभीर घटना असताना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल करण्यास विलंब का केला असावा? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

"औषधांच्या सर्व बाटल्या रिकाम्या होत्या. मी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती." गिरिजा फुटाणे, खडकवासला धरण शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग

"पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी याबाबत चर्चा करण्यात येईल."

-डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT