टाकळी ढोकेश्वर : बहिरोबावाडी पारनेर येथील देठे परिवारात अनोखा विवाह सोहळा पार पडला.मन जडली तर मग ते सातासमुद्रापार जाऊन संसार थाटू शकतात.याचाच प्रत्यय पारनेर तालुक्यात पहावयास मिळाला बहिरोबावाडीच्या नवरदेवाने थेट अमेरिकेतील मुलीला लग्नाची मागणी घातली.विकास देठे असं या नवदेवाच नाव आहे तर स्टेफनी हक असं नवरी मुलगीचं नाव आहे.
बहीरोबावाडीतील माजी सैनिक अर्जुन देठे यांचा मुलगा विकास हा नोकरीनिमित्त अमेरिकेतील ट्रेडेन्स या कंपनीत उत्पादन व्यवस्थापक या पदावर काम करत आहे.या दरम्यान विकास व स्टेफनी यांचा परिचय होऊन मैञीत रूपांतर झाले पुढे दोघांनीही विवाह करण्याचे निश्चित केले.स्टेफनी या जेम्स हक यांच्या द्वितीय कन्या असुन त्यांनी देखील डेन्व्हर विद्यापीठातुन प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स व बोस्टन विद्यापीठातुन मास्टर्स इन थिएटर या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत.सध्या स्टेफनी या ऍमेझॉन या कंपनीत उत्पादन विपणन व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत.अमेरिका व भारत या देशांची संस्कृती , धर्म,भाषा भिन्न असताना देखील या दोघांच्याही कुटुंबाने या विवाहासाठी कुठल्याही प्रकारचा विरोध न करता संमती देत एक आदर्श समाजापुढे ठेवला आहे.
तालुक्यात यापुर्वी गोरेगाव,भनगडेवाडी येथे परदेशी मुली सुना म्हणुन आलेल्या असताना आता बहिरोबावाडी सारख्या अतिशय छोट्याशा गावात देखील देठे परिवाराने अमेरिका येथील युवतीला आपली सुन म्हणुन स्विकारले आहे.
अर्जुन देठे,मुलाचे वडील यांची प्रतिक्रिया
मुलाने अमेरिकेतील मुलीचा लग्नाचा प्रस्ताव घेऊन आल्यानंतर सुरवातीस नकारात्मक भुमिका आमची होती. हक कुटुंबातील
मुलगी स्टेफनी तिचे वडील,आई यांच्याशी सवांद झाल्यानंतर आम्ही सकारात्मक झालो या कुटुंबाने आपल्या संस्कृती प्रमाणे लग्नसमारंभीतील सर्व धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेत आनंदात आपली मुलगी देठे परिवारात दाखल केली.
अमेरिकेतील हक कुटुंबाची प्रतिक्रिया
वेगळ्या देशात आपली मुलगी विवाह करणार आहे हे ऐकल्यावर जरा भिती वाटली होती मात्र येथे भारतात आल्यानंतर येथील विवाह सोहळ्यातील हळदी,साखरपुडा,नव-या मुलाची मिरवणुक हे सर्व पाहिल्यानंतर एक आपलेपणा जाणवला सर्व घरातील सदस्य फार आपलुकीने हे सर्व करत होते याचे खुप समाधान वाटले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.