pune sakal
पुणे

Pune : पुणे-पानशेत रस्त्यावरील पूल कोसळल्यास वाहतुकीसह वीजेचीही गंभीर समस्या उद्भवणार

घसरत चाललेल्या भागावर उच्चदाब वीज वाहक तारांचे दोन खांब; जिल्हाधिकाऱ्यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना

निलेश बोरुडे

सिंहगड - पुणे-पानशेत रस्त्यावरील मागील दोन वर्षांपासून खचत असलेला पूल सध्या कोसळण्याच्या स्थितीत असून त्याबरोबर पानशेतसह परिसरातील अनेक गावांना वीजपुरवठा करणाऱ्या उच्चदाब वीजवाहक तारांचे खांबही कोसळणार आहेत.

पूल कोसळल्यास वाहतूक तर बंद होणार आहेच शिवाय हवेली व वेल्हे तालुक्यातील अनेक गावांचा वीजपुरवठाही खंडीत होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पुणे-पानशेत रस्ता हा हवेली व वेल्हे तालुक्यातील अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. स्थानिकांसह पर्यटकांचीही या रस्त्यावरून रात्रंदिवस वर्दळ सुरू असते. सध्या खचलेल्या पुलाच्या ठिकाणी तात्पुरती भर टाकून सार्वजनिक बांधकाम विभागाने एकाच बाजूने वाहतूक सुरू ठेवलेली आहे.

मात्र दिवसेंदिवस पूलाचा सुमारे दोनशे फूट लांबीचा व पंधरा ते वीस फूट रुंदीचा भाग अधिकाधिक खाली घसरत चालला आहे. या भागावर उच्चदाब वीज वाहक तारांचे दोन खांब असून तेही खचत चालले आहेत.

त्यामुळे सदर पूल कोसळल्यास अनेक गावांचा संपर्क तर तुटणार आहेच शिवाय वीजेचीही गंभीर समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच याबाबत गांभीर्याने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

"ज्या ठिकाणी पूल खचला आहे तेथे एक खांब रोवून तारांना आधार देण्यात आलेला आहे. आणखी एकदा प्रत्यक्ष पाहणी करुन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील." अतिष इंगळे, सहाय्यक अभियंता, महावितरण, खानापूर.

"खचलेल्या पूलाच्या जागी नवीन पूल करण्याबाबत वेगाने कार्यवाही सुरू आहे. निधीला मंजुरी मिळालेली असून टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पावसाळ्यापूर्वी काम सुरू करण्याचा प्रयत्न आहे." बाप्पा बहीर, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.

"खचलेल्या पुलाच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच दुर्घटना घडण्याच्या अगोदर तातडीने पुलाचे काम करुन घेण्याबाबत सांगण्यात आले आहे. लवकरच भेट देऊन पाहणी करणार आहे."

डॉ राजेश देशमुख, जिल्हाधिकारी,पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT