bridgestone india csr event 16th global csr and esg summit awards 2024 Sakal
पुणे

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : - खास महिलांसाठी असलेला ब्रिजस्टोन इंडिया’चा ड्रायव्हर ट्रेनिंग प्रोग्राम आणि महिलांना व्यवसायात स्वावलंबी होण्यासाठी प्रशिक्षण देणाऱ्या उपक्रमाला 16व्या जागतिक सीएसआर आणि ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये महिला सक्षमीकरणासाठी प्लॅटिनम पुरस्कार आणि साक्षरता आणि शिक्षणाच्या तरतुदीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी सुवर्णपदक मिळाले आहे.

ब्रिजस्टोन कॉर्पोरेशनची समूह कंपनी ब्रिजस्टोन एशिया पॅसिफिक, इंडिया, चीन (BSAPIC), ने विजेत्या प्रवेशिका सादर केल्या. ज्यात चीनमधील ब्रिजस्टोनचा 'ग्रीन आयटी क्लासरूम' कार्यक्रम, भारतातील मुलांच्या शिक्षणाला सहाय्य करण्यासाठी ब्रिजस्टोनचे रिसोर्स सेंटर, तसेच अनुक्रमे इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियामधील व्होकेशनल ट्रेनिंग आणि अप्रेंटीसशिप प्रोग्राम यांचा समावेश होता.

"ब्रिजस्टोन ही जेंडर इक्वॅलिटी म्हणजेच लैंगिक समानतेसाठी वचनबद्ध आहे आणि 2010 मध्ये संयुक्त राष्ट्र महिला तसेच यूएन ग्लोबल कॉम्पॅक्टने विकसित केलेल्या महिला सक्षमीकरण तत्त्वांवर स्वाक्षरी करणारा देखील आहे. ब्रिजस्टोन इंडियामध्ये, ही बांधिलकी आम्ही सेवा देत असलेल्या समुदायांप्रती आमच्या उपक्रमांमध्येही प्रतिबिंबित होते.

शिक्षणाबरोबरच त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे हे महिला सक्षमीकरणातील एक महत्त्वाचे पाऊल आहे. महिलांसाठीचे आमचे जनसंपर्क कार्यक्रम या क्षेत्रांवर केंद्रित आहेत. या उपक्रमांसाठी जागतिक संस्थेकडून मान्यता मिळणे हा खरोखरच एक सन्मान आहे.” अशी माहिती ब्रिजस्टोन इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर हिरोशी योशिझेन यांनी दिली.

ब्रिजस्टोन इंडिया’चे टेक्निकल ड्रायव्हर ट्रेनिंग

या प्रोग्राममुळे इंदोर, धार, पुणे येथील महिलांना वाहन चालवण्याचा व्यवसाय स्वीकारण्याची संधी मिळाली. ज्यामुळे त्यांना लिंगनिहाय आणि साचेबद्ध सामाजिक रूढी मोडणे शक्य झाले. सन 2023 मध्ये, 206 महिलांनी प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला. ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली. विशेषतः महिला प्रवासी, कुटुंबे आणि वृद्धांकडून असलेली महिला चालकांची मागणी पूर्ण करता आली.

ग्रामीण उद्योजकता

ब्रिजस्टोनच्या चाकण, पुणे प्रकल्पाच्या जवळ, 50 हून अधिक महिलांना मुलांचे कपडे, सणासुदीच्या हंगामातील वस्तू आणि उपकरणे तयार करणे यासारख्या प्रयत्नांमध्ये व्यवसाय स्वावलंबनाचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच ब्रिजस्टोन’च्या वतीने कॉर्पोरेट पुरवठादार करार स्थापित करण्यात मदत केली. या कार्यक्रमात पुणे येथील ऑर्गनायझेशन फॉर सस्टेनेबल अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशनसोबत ब्रिजस्टोन भागीदारी करत आहे.

16 व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024™ला कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरण, सामाजिक आणि कॉर्पोरेट प्रशासनासाठी आशियातील सर्वात प्रतिष्ठित मान्यता पुरस्कार कार्यक्रमांपैकी एक म्हणून मान्यता मिळाली आहे.

हा कार्यक्रम कंपन्यांना नैतिक मूल्यांचा समावेश करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी, कायदेशीर आवश्यकतांचे पालन करणे, त्याचप्रमाणे व्यक्ती, समुदाय आणि पर्यावरणासाठी ते ज्या प्रकारे व्यवसाय करतात त्याबद्दल आदर दर्शवितो आणि सन्मानित करतो. यावर्षी, 20 श्रेणींमध्ये सर्वोच्च पुरस्कारांसाठी 250 हून अधिक अर्ज आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT