Brij Bhushan Sharan Singh sakal
पुणे

Brij Bhushan Singh : ब्रिजभुषण सिंह यांच्या प्रतिमेला पुण्यात मारले जोडे; वंदेमातरम् संघटनेच्या वतीने कारवाईची मागणी

सत्तेचा गैरवापर करून कुस्तीपटूंवर दबाव आणला जातोय अशा गुंड प्रवृत्तीच्या माणसावर कारवाई केली नाही तर भविष्यात आंदोलन तीव्र केले जाईल.

सकाळ वृत्तसेवा

Brij Bhushan Sharan Singh - भाजपचे खासदार ब्रिजभुषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे गुन्हे दाखल केले आहेत. तरी देखील खासदार ब्रिजभुषण यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत पुण्यातील वंदेमातरम् संघटनेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला काळे फासून, जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

वंदेमातरम संघटनेच्या वतीने मंगळवारी बालगंधर्व चौकात भारतीय महिला कुस्तीपटू यांच्या समर्थनात खासदार ब्रिजभुषण यांच्या निषेधार्थ खासदार ब्रिजभुषण यांच्या प्रतिमेला काळे फासून, जोडे मारून जाहीर निषेध करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी खासदार ब्रिजभुषण यांची पक्षातून हकालपट्टी करावी, राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्षपद काढून घ्यावे, त्यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करावी,

सत्तेचा गैरवापर करून कुस्तीपटूंवर दबाव आणला जातोय अशा गुंड प्रवृत्तीच्या माणसावर कारवाई केली नाही तर भविष्यात आंदोलन तीव्र केले जाईल. असा इशारा वंदेमातरम संघटनेच्या वतीने प्रदेश कार्याध्यक्ष सचिन जामगे यांनी दिला.

यावेळी महेश बाटले, मोहित काकडे, अमोल जगताप, अश्रू खवळे, संचित कर्वे, विनोद मोहिते, महानंदा राजघाटे, गोदाबाई ताकतोडे, वैशाली रणदिवे, सुकन्या जानराव, पुनम दास

संघटनेच्या महिला कार्यकर्त्या, पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती 200 पार; महाविकास आघाडीची मोठी निराशा

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT