businessman Avinash Bhosale sakal
पुणे

पुणे : अविनाश भोसलेंची आणखी 4 कोटींची मालमत्ता जप्त; ईडीची कारवाई

सकाळ डिजिटल टीम

ईडीने अविनाश भोसलेंना समन्स बजावले होते. मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांची चौकशी सुरु होती.

पुणे - प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्याी 4 कोटींची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. याआधी ईडीने अविनाश भोसलेंना समन्स बजावले होते. मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांची चौकशी सुरु होती. आता ईडीने त्यांची 4 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. शिवाजीनगर येथील गणेशखिड येथे असलेल्या ऑफिसची मालमत्तेवर कारवाई करण्यात आली आहे.

ईडीने याआधी बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यासह कुटुंबाची जवळपास 40.34 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. परदेश चलन नियंत्रण कायदा 1999 अंतर्गत ही कारवाई केली होती. अविनाश भोसले यांच्यासह कुटुंबियांनी FEMA चे उल्लंघन करून ठेवलेल्या फॉरेन सिक्युरिटीज जप्त करण्यात आल्या होत्या. यात भारताबाहेर असलेल्या फॉरेन सिक्युरिटीज किंवा स्थावर मालमत्ताही जप्त केली जाऊ शकते.

सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची गणेशखिंड रस्त्यावरील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमीटेड (एबीआयएल) हि चार कोटी रुपये किंमत असलेली मालमत्ता आहे.

गणेशखिंड रस्त्यावरील रेंजहिल्स कॉर्नरजवळ "एआरए प्रॉपर्टीज' या कंपनीची जागा आहे. या जागेत अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेड कंपनीचे (एबीआयएल) कार्यालय आहे. ईडीकडून भोसले यांच्याविरुद्ध परकीय चलन गैरव्यवहार प्रकरणी (फेमा) आणि काळा पैसा प्रतिबंध कायद्यान्वये (प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉंडरींग ऍक्‍ट-पीएमएलए) गुन्हे दाखल करण्यात आले होते. गणेशखिंड रस्त्यावरील भोसले यांच्या कार्यालयाच्या जागेचे बेकायदा हस्तांतरण झाल्याचे ईडीकडून करण्यात आलेल्या तपासात निष्पन्न झाले होते. त्यानंतर ईडीकडून भोसले यांच्या कार्यालयावर जप्तीची कारवाई करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT