Garbage in Pune City Sakal
पुणे

पुणेकरांच्या बेफिकिरीने अभियानाचा ‘कचरा’

सार्वजनिक ठिकाणी केर फेकण्याची वृत्ती; वर्षभरामध्ये ४४ लाखांचा दंड वसूल

ब्रिजमोहन पाटील - सकाळ वृत्तसेवा

पुणे: स्वच्छ भारत अभियानासाठी शहराचे परीक्षण करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक आले असताना रस्त्याच्या कडेने, मोकळ्या जागी, मैदानात; नाले, नदी यांसह विविध ठिकाणी कचरा टाकल्याचे दर्शन या पथकाला झाले. देशात शहर स्वच्छतेत पहिला क्रमांक पटकाविण्याचा प्रयत्न करणाऱ्या महापालिकेची यामुळे डोकेदुखी वाढली आहे. गेल्या वर्षभरात सुमारे ४४ लाखांचा दंड वसूल केला, तरीही नागरिकांकडून कचरा फेकण्याची वृत्ती कायम आहे. यामुळे शहराचा बकालपणा वाढला आहे.

ठोस कृतीचा अभाव

शहरातील बहुतांश भागात पादचारी मार्ग, रस्त्यावरचे कोपरे, झाडाच्या बुडाला कचरा टाकला जात आहे. महापालिकेच्या पथकांकडून दंडात्मक कारवाईपेक्षा जास्त परिणामकारक कारवाई केली जात नसल्याने शहरात कचरा, राडारोडा पडलेला दिसून येत आहे. गेल्यावर्षी पुणे महापालिकेचा स्वच्छ भारत अभियानात देशात पाचवा क्रमांक आला. २०२२ यामध्ये आणखी सुधारणा व्हावी, यासाठी पुणे महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.

वारजेवरून कात्रजच्या दिशेने जाताना नदी पुलावरूनच कचऱ्याची पिशवी

थेट रस्त्याच्या बाजूला भिरकावून दिली जाते.

फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर गोपाळ कृष्ण गोखले चौकाच्या परिसरातील हॉटेलमधून चहा प्यायचा, त्याचा कप तेथेच फेकायचा.

वडापाव खाल्ला की कागदी प्लेट पादचारी मार्गावरच फेकून द्यायची,

ती कचऱ्याच्या डब्यात टाकण्याची तसदी घ्यायची नाही.

सिंहगड रस्त्यावर गोयलगंगा परिसरातील हॉटेलचालक खरकटे महापालिकेकडे

न देता रात्री उशिरा ड्रेनेजमध्ये, मोकळ्या जागेत फेकून देतात.

कात्रज घाट महापालिकेच्या हद्दीत आल्यानंतर घाटातील कचरा उचलण्यात आला, त्यानंतर पुन्हा घाटात कचरा, राडारोडा फेकून देण्याचे प्रमाण वाढले.

शहराच्या सर्व प्रवेशद्वारांवर महामार्गाच्या दोन्ही बाजूने कचरा टाकला जात आहे.

उपनगरांमध्ये मोकळे प्लॉट म्हणजे डंपिंग ग्राउंडच झाले आहेत.

केंद्र सरकारचे पथक पुण्यात स्वच्छ सर्वेक्षणासाठी आले होते. शहराच्या विविध भागात मोकळ्या जागेत कचरा टाकला जातो. त्याचा परिणाम या सर्वेक्षणावर होतो. इंदूर शहरात रस्त्यावर तेथील प्रत्येक नागरिक कचरा कचऱ्याच्या पेटीत कचरा टाकतो, त्यामुळे त्यांचा देशात पहिला क्रमांक येतो. आपणही मानसिकता बदलली पाहिजे. स्वच्छचे कर्मचारी, महापालिकेची घंटागाडी, कचरापेटी येथे कचरा टाकला, तर तो थेट प्रकल्पावर जाईल व प्रक्रिया होऊन शहरही स्वच्छ होईल.

- अजित देशमुख, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग

आपल्या भागात काय स्थिती?

काही बेशिस्त नागरिकांमुळे अस्वच्छता पसरत आहे. आपल्या परिसरातील स्वच्छतेबाबतची परिस्थिती फोटोंसह पाठवा, तसेच काही विधायक उपक्रम राबविले असतील तर तेही आपल्या नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सअप क्रमांकावर कळवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT